शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वनवा लावल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षिकेला १० हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

सातारा : वणवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षिकेला १० हजार रुपये ...

सातारा : वणवा लावण्यास कारणीभूत झाल्याप्रकरणी रेनावळे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षिकेला १० हजार रुपये दंडाची शिक्षा वाई न्यायालयाने शनिवारी सुनावली.

शिवाजी लक्ष्मण पार्टे (रा. वेलंग, ता. वाई) व नलिनी गणेश खरात (रा. शिरगाव, ता. वाई), अशी आरोपींची नावे आहेत. पार्टे हे मुख्याध्यापक, तर खरात शिक्षिका म्हणून काम करतात.

वनाधिकाऱ्य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, रेनावळे येथील राखीव वनक्षेत्रास २६ फेब्रुवारी २०२१ रोजी वणवा लागला होता. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक हा वनवा विझविला होता. शिवाजी पार्टे व नीलिमा खरात यांनी रेनावळे गावातील शाळेजवळ कचरा व कागद पेटवून दिले होते. या कचऱ्यातील कागद व पालापाचोळा वाऱ्याने उडून शेजारच्या मालकी क्षेत्रात पडल्याने तेथील गवताने पेट घेतला. ही आग जवळच्या वनक्षेत्रात पसरली. या आगीत वनक्षेत्रातील २२ हेक्टर वनक्षेत्र जळून शासनाचे ११ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम २६ (१), (ब), (फ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वनपाल भाऊसाहेब कदम व प्रभारी वनपाल रत्नकांत सीताराम शिंदे यांनी केला. आरोपींविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाई यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

वन गुन्ह्यातील दोन्ही संशयितांनी वाईचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.आर. माळी यांच्यासमोर गुन्हा कबूल केला. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २० दिवसांची साधी कैद ही शिक्षा सुनावली. आरोपींनी एकूण १० हजार रुपये दंड न्यायालयात भरला. सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले.