शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

माणमधील ४७ गावांत संघर्षमय दुरंगी-तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी भाटकी, गंगोती, पुकळेवाडी, इंजबाव, वाकी, हावलदारवाडी, मोही, मार्डी, थदाळे, जाशी, तोंडले, टाकेवाडी, स्वरूपखानवाडी, ...

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी भाटकी, गंगोती, पुकळेवाडी, इंजबाव, वाकी, हावलदारवाडी, मोही, मार्डी, थदाळे, जाशी, तोंडले, टाकेवाडी, स्वरूपखानवाडी, लोधावडे या १४ गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी, उर्वरित ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही ठिकाणी दुरंगी तर काही गावात तिरंगी लढत होत असल्याने, टोकाचे राजकारण होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर पक्षांनी एकत्र येत भाजपासमोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून अनेक सत्ता काबीज केल्या असून, सध्या माणमधील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यासाठी १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार असून, गटा-तटाने खेळल्या जाणाऱ्या राजकीय आखाड्यात यंदा मात्र भाजपाविरोधात महाविकास आघाडीचीच रस्सीखेच रंगणार असल्याचे निदर्शनास येत आहे.

अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या आणि टोकाचे राजकारण खेळणाऱ्या देवापूर, कुकुडवाड, काळचौंडी, शिंगणापूर गावांंमध्ये मतदानासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. कुरघोड्यांचे राजकारण करून गावकीकरिता गावपातळीवरील संघर्ष भाव-भावकीत पेटणार आहे.

चौकट:

ऊसतोड मजुरांच्या निर्णायक मतदानासाठी गावनेत्यांची लगबग !

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून, रणधुमाळीला वेग आला आहे. एकेक मत सुद्धा महत्त्वाचे असून, त्यासाठी गावोगावचे पॅनेलप्रमुख, उमेदवार यांनी कंबर कसली आहे. निवडणूक ताकदीने लढविण्याची तयारी करत आहेत. त्यातील काही चाणाक्ष पॅनेलप्रमुख, ऊसतोडणीस गेलेल्या कर्नाटक, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील मजुरांना भरमसाट खर्च करून गावी आणून त्यांचे निर्णायक मत आपल्या पारड्यात कसे पडेल, यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे.