corona cases in Satara : मेघलदरेवाडीतील एका वस्तीवर पन्नास कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 19:59 IST2021-06-25T19:58:07+5:302021-06-25T19:59:52+5:30

corona cases in Satara : एका बाजूला जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे आशादायक चित्र असतानाच खटाव तालुक्यातील काही गावांत धोक्याची घंटा वाजत आहे. जेमतेम आठशे लोकसंख्या असलेल्या मेघलदरेवाडीत (रामोशीवाडी ) काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आरोग्य तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकाच वस्तीवर पन्नासहून बाधित सापडल्याने आरोग्य प्रशासनाबरोबरच आजूबाजूची गावंही हादरून गेली.

Fifty corona affected a settlement in Meghaldarewadi | corona cases in Satara : मेघलदरेवाडीतील एका वस्तीवर पन्नास कोरोना बाधित

corona cases in Satara : मेघलदरेवाडीतील एका वस्तीवर पन्नास कोरोना बाधित

ठळक मुद्देमेघलदरेवाडीतील एका वस्तीवर पन्नास कोरोना बाधित आरोग्य विभाग हादरला : आरोग्य तपासणी मोहीमेत धक्कादायक माहिती उघडकीस

पुसेगाव /सातारा : एका बाजूला जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे आशादायक चित्र असतानाच खटाव तालुक्यातील काही गावांत धोक्याची घंटा वाजत आहे. जेमतेम आठशे लोकसंख्या असलेल्या मेघलदरेवाडीत (रामोशीवाडी ) काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आरोग्य तपासणीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकाच वस्तीवर पन्नासहून बाधित सापडल्याने आरोग्य प्रशासनाबरोबरच आजूबाजूची गावंही हादरून गेली.

त्यानंतर येथील प्रत्येक वाड्यावस्त्यांवर तपासणी शिबीर आयोजन करूनही नागरिक तपासणी करायला पुढे येत नसल्याने प्रशासनाने जाखणगाव येथील चौकात पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेत येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी करण्याचा नविन फंडा सुरू केला आहे.
पहिल्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव फक्त शहरांपुरता मर्यादीत होता. मात्र दुसऱ्यात लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अधिक वाढले आहे. यातून ग्रामिण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या कामगिरीवर चारीबाजूने टिकांचा भडीमार होताना दिसत आहे.

खटावच्या आरोग्य केंद्राच्या अख्त्यारीत असणाऱ्या गावांतील नागरिकांना दहा, दहा किलोमीटरचा टेस्टसाठी प्रवास करायला लागू नये म्हणून येथील थेट गाव, वस्त्या व वाड्यावर पोहचून शिबिराचे आयोजन वरचेवर करण्यात येत आहे. मात्र येथील नागरिक या चाचण्या सहजासहजी करून घेण्यास तयार होत नसल्याचे दिसत आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी फडतरे, आरोग्य सेवक चंद्रशेखर सावळकर, अंगणवाडी सेविका सुनिता काटकर, आरोग्य सेविका माया पवार, संकेत पवार उपस्थित होते.

नागरिकांच्या सहकार्याअभावी प्रशासन हतबल

रामोशीवाडीत मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागल्याने जवळपासच्या वाड्यावस्त्यांत तपासणी शिबिर भरवण्यात आले. त्यापैकी गादेवाडी येथे शिबीर भरवून एकही नागरिक तपासणीला फिरकला नसल्याने प्रशासनाला रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. त्यामुळे आता नाईलाजास्तव पोलिसांचा धाक दाखवून जाखणगाव चौकात वरचेवर भेटेल त्या प्रत्येक प्रवाशांची तपासणीचे काम हाती घेण्यात आले, अशी माहिती खटाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. पराग रणदिवे यांनी दिली.

 

Web Title: Fifty corona affected a settlement in Meghaldarewadi