शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा तासांनंतर जखमी बिबट्याची शोधमोहीम थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : जखमी बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. कराड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : जखमी बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी १५ तास स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. कराड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर येथील विशेष पथकाने ओढे-नाल्यांसह २० हेक्टर ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही. दरम्यान, अपघातानंतर उपलब्ध झालेल्या व्हिडिओतील हालचालीवरून त्याला मोठी दुखापत झाली नसल्यामुळे तो नैसर्गिक अधिवासात मार्गस्थ झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पंधरा तासांनंतर जखमी बिबट्याची शोधमोहीम थांबविण्यात आली.

सिमेंटच्या जंगलात वाढ झाल्यामुळे नैसर्गिक जंगलाचा ऱ्हास होत आहे. परिणामी वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढल्याने भक्ष्याच्या शोधात बाहेर पडणाऱ्या वन्यप्राण्यांच्या जिवावर बेतत आहे. गेल्या दहा दिवसांत वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू होण्याच्या चार घटना घडल्या आहेत. तर ऊसाच्या रानात मृत अवस्थेत बिबट्या सापडल्याच्या घटनाही उघड झाल्या आहेत. तशीच घटना नांदलापूर गावच्या हद्दीत पाचवडफाट्यानजीक हॉटेल समृद्धीसमोर मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात वाहनाची धडक बसल्यानंतर अचानक बिबट्याने महामार्गावरच ठिय्या मारला. पंधरा मिनिटांतच गर्दी बघून जखमी बिबट्याने जीव वाचविण्यासाठी महामार्ग ओलांडून कृष्णा नदीकडील ऊसाच्या रानात धूम ठोकली होती. त्या दिवशी रात्रीच्यावेळी अधिकाऱ्यांसह प्राणीमित्र व नागरिकांनी रात्री साडेबारा वाजेपर्यंत महामार्गालगत व ऊसाच्या बाजूने शोध घेतला. मात्र, बिबट्या आढळला नाही. साडे बारा वाजता शोधमोहीम थांबविली. बुधवारी सकाळी पुन्हा साडेसात वाजता शोधमोहीम सुरू केली. बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. या शोधमोहिमेसाठी वन्यजीव सुरक्षाअंतर्गत फॉरेस्ट ट्रॅकचा अवलंब करण्यात आला. तर बुधवारी सकाळपासूनच १५ तासांत निनाई ओढ्याच्या दुतर्फा २० हेक्टर ऊसक्षेत्रात शोधमोहीम राबविली. या शोधमोहिमेत कराड वन विभागासह कोल्हापूर येथील विशेष पथकातील अकरा कर्मचाऱ्यांनी ओढे-नाल्यांसह झाडा-झुडपातून व ऊसाचे क्षेत्र पिंजून काढूनही बिबट्या सापडला नाही. दरम्यान, अपघातानंतरचा एक व्हिडिओ वनविभागाला उपलब्ध झाला. त्या व्हिडिओतील बिबट्याच्या गतिमान हालचालीवरून त्याला मोठी दुखापत झाली नसल्याचे जाणवत आहे. त्यामुळे तो नैसर्गिक अधिवासात मार्गस्थ झाल्याचा अंदाज वर्तवित वनविभागाकडून पंधरा तासांनंतर जखमी बिबट्याची शोधमोहीम थांबविण्यात आली आहे.

चौकट

शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता

महामार्गाच्या पूर्वेस ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊसतोडणी सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी, ट्रॅक्टर चालक मालक, ऊसतोडणी मुकादम व मजुरांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे काही आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क करावा, असे अावाहनही वनपाल ए. पी. सवाखंडे यांनी केले आहे.