वाई तहसील कार्यालयासमोर उपोषण

By Admin | Updated: January 13, 2015 00:17 IST2015-01-12T21:33:19+5:302015-01-13T00:17:09+5:30

मनसेचे तहसीलदारांना निवेदन : प्रांत कार्यालयाच्या मनमानी कारभाराचा विरोध

Fasting in front of Wai Tahsil office | वाई तहसील कार्यालयासमोर उपोषण

वाई तहसील कार्यालयासमोर उपोषण

वाई : महसूल संबंधीची अनेक कामे दीर्घ काळापासून प्रलंबित असून, त्याचा पाठपुरावा करून प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लावून सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वाई तालुका मनसेच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले़ भूमापन कार्यालयात नकाशे, उतारे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात़ शालेय प्रवेशासाठी लागणारे सर्व प्रकारचे दाखले वेळेत मिळत नाहीत़ महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची टॅक्सच्या नावाखाली लुबडणूक केली जाते. आसरे, रेणावळे लोकांचे गेल्या वीस वर्षांपासून पुनर्वसन प्रश्न प्रंलबित आहेत, अशा अनेक प्रलंबित प्रश्नांची पूर्तता करून प्रश्न मार्गी लावण्यात यावेत, अशा मागण्या मनेसेच्या वतीने करण्यात आल्या. दरम्यान, तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत प्रातांधिकारी व मनसे पदाधिकाऱ्यांची समन्वय आढावा बैठक घेण्याचे आश्वासन दिले़ यावेळी उपोषणकर्त्यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. या उपोषणामध्ये तालुकाध्यक्ष विक्रम वाघ, माजी तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, शहराध्यक्ष विश्वास सोनावणे, नामदेव सणस, नारायण वाडकर, शिवाजी टिके, सूरज गोळे, मकसुद शेख, यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Fasting in front of Wai Tahsil office