वेगवान ‘ग्रे हाउंड’, धिप्पाड ‘ग्रेट डेन’, देखणी ‘लासा’

By Admin | Updated: November 28, 2015 00:22 IST2015-11-27T21:48:22+5:302015-11-28T00:22:42+5:30

कऱ्हाड कृषी प्रदर्शन : स्पर्धेत शेकडो श्वानांचा सहभाग; आठ महिन्यांचा ‘हार्लिक्विन’, पंधरा सेंटीमीटरचा ‘मिनिअ‍ेचर’ आकर्षण

Fast 'Gray Hound', Dippad 'Great Dane', 'Lasa' | वेगवान ‘ग्रे हाउंड’, धिप्पाड ‘ग्रेट डेन’, देखणी ‘लासा’

वेगवान ‘ग्रे हाउंड’, धिप्पाड ‘ग्रेट डेन’, देखणी ‘लासा’

कऱ्हाड : येथील यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाला शुक्रवारी तिसऱ्या दिवशी हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली. प्रदर्शनातील नावीन्यपूर्ण अवजारे, प्रगत तंत्रज्ञान, शेती, शेतीपूरक व्यवसाय व गृहोपयोगी वस्तू पाहून शेतकरी सुखावले. या प्रदर्शनात शुक्रवारी श्वान स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये विविध जातींचे शेकडो श्वान सहभागी झाले होते.श्वान प्रदर्शनात डॉबर मॅन, लॅब्रॉडर, आॅलसीसीन, बुल मस्टिफ, कॉकसेसियस, जर्मन शेफर्ड, गे्रहोंड, ग्रेडेन, कारवान, मुधोळहोंड, बॉक्सर, रॉट व्हिलर, युटीलिटी, पश्मी, पामेरियन, या सर्वसाधारण गटातील शेकडो श्वान स्पर्धेत दाखल झाले होते. श्वानांचे मालक उत्सुकतेने माहिती घेणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती देत होते. फॅन्सी डॉगमध्ये पग, लासा (डेशहाउंड), पांढरी केसाळ पामेरियन, अ‍ॅपसो, कॉकर स्पॅनिअल लहान मुलांसह महिलांचे आकर्षण ठरत होते. अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण असणारी ही श्वान दिसायला देखणी होती. चपळ व वेगवान असणारे ग्रेहोंड, धिप्पाड व दणकट असणारे ग्रेडेन, शिकारीसाठी प्रसिद्ध असणारे कारवान व पश्मी यांची माहिती लोक उत्सुकतेने घेत होते. तर कुटुंबांशी समरस होणाऱ्या लॅब्रॉडोरनेही उपस्थितांची मने जिंकली.ग्रेट डेन गटातील हार्लिक्विन या जातीचा आठ महिन्यांचा सर्वांत उंच श्वानही आकर्षण ठरत होता. ‘मिनिअ‍ेचर’ हा सुमारे १५ सेंमी उंचीचा सर्वात लहान श्वान पाहण्यासाठी गर्दी होत होती. सेंट बर्नाड व इंग्लिश मॅस्टिक हे सर्वांत मोठी असणारे व जबडा मोठे असणाऱ्या श्वानाची माहिती घेण्यासाठी गर्दी झाली होती. श्वानांचे मूल्यांकन करण्यासाठी श्वान डॅशबोर्ड आखण्यात आला होता. यामध्ये श्वानाची चाचणी घेऊन तपासणी करण्यात येत होती. हे पाहण्यासाठीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


पिलांची किंमत पंधरा हजारांपर्यंत
सांगली जिल्ह्यातूनही प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने श्वान आले होते. जाहिरातींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे पग जातीचे श्वान पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर चढाओढ दिसून येत होती.
अनेक श्वान मालकांनी त्यांच्या श्वानाची पिल्लेही विक्रीसाठी आणली होती. ज्यांच्या किंमती ५ हजारांपासून १५ हजारांपर्यंत होत्या.
दरवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या प्रदर्शनात ग्रेट डेन जातीचे श्वान मोठ्या संख्येने दिसून येत होते.


प्रदर्शनात गृहोपयोगी
वस्तूंची रेलचेल
कऱ्हाड : यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात यावर्षी मेक इन महाराष्ट्रचाही बोलबाला आहे. कृषिपूरक पदार्थांबरोबरच अनेक गृहोपयोगी वस्तूंनी प्रदर्शन सजल्याचे पाहावयास मिळत आहे.
बचतगटांना तसेच शेतकऱ्यांना काही स्टॉल्स मोफत देण्यात आले आहेत. या बचत गटांचीही उत्पादने विक्रीस उपलब्ध आहेत. शीतपेये, गुणकारी औषधे, आयुर्वेदिक वनस्पती, संसारोपयोगी साहित्यही प्रदर्शनात विक्रीस उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)


मातीच्या भांड्यांचा वापर
प्रदर्शनात यावर्षी प्रथमच मिट्टीकुलचा मातीच्या भांड्यांचा स्टॉल लावण्यात आला आहे. मातीचा कुकर, मटका, वॉटर बॉटल, वॉटर फिल्टर, डिनर सेट, तवा यासह अन्य गृहोपयोगी वस्तू मातीच्या बनविलेल्या आहेत. ही उत्पादने प्रदर्शनात उपलब्ध असून, त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही भांडी बनविण्यासाठी पाच प्रकारांच्या मातीचा वापर करण्यात आला आहे. शरीरास उपयुक्त असणारी जीवनसत्त्वे या भांड्यांच्या वापरातून मिळत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आरोग्यासही फायदा होत असल्याचेही सांगण्यात आले. मातीच्या भांड्यांचे तीन स्टॉल्स प्रदर्शनात आहेत.

Web Title: Fast 'Gray Hound', Dippad 'Great Dane', 'Lasa'