सवलतीच्या दरात बियाणे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : धुमाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:17+5:302021-06-17T04:26:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रुक : जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना अनुदानावर बियाण्याचे वाटप करण्यात येत आहेत. या योजनेचा ...

Farmers should take advantage of seed scheme at discounted rates: Dhumal | सवलतीच्या दरात बियाणे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : धुमाळ

सवलतीच्या दरात बियाणे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : धुमाळ

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपोडे बुद्रुक : जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना अनुदानावर बियाण्याचे वाटप करण्यात येत आहेत. या योजनेचा शुभारंभ कोरेगाव पंचायत समिती आवारात कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ यांच्या हस्ते पार पडला. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी सभापती धुमाळ यांनी केले आहे.

या वेळी पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, बाजार समितीचे संचालक गुलाबराव जगताप, भूषण पवार, जितेंद्र जगताप, कृषी विभागाचे संजय बर्गे आदी उपस्थित होते.

कोरेगाव पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ५० टक्के अनुदान तत्त्वावर वाटाणा बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. या योजनेद्वारे प्रतिशेतकरी कमाल १० किलो वाटाणा बियाणे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे अधिकारी संजय बर्गे यांनी दिली.

दरम्यान, या योजनेचा कोरेगाव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी सभापती मंगेश धुमाळ, पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे यांनी केले आहे.

-----------------------------------------------

फोटो ओळ : कोरेगाव येथे शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाणे वाटप करण्यात आले. या वेळी कृषी समिती सभापती मंगेश धुमाळ उपस्थित होते.

Web Title: Farmers should take advantage of seed scheme at discounted rates: Dhumal