शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फोडल्यानंतरच शेतात शेतकरी करतोय ‘एन्ट्री’

By admin | Updated: August 26, 2015 21:21 IST

जीव वाचविण्यासाठी नवा फंडा : जंगली श्वापदांचा मानवी वस्तीकडे मोर्चा

ढेबेवाडी : नैसर्गिक वृक्षांच्या जंगलात मानवनिर्मित पवनऊर्जा प्रकल्पांची जंगले निर्माण झाल्याने पाटण तालुक्यातील वाल्मीक परिसरातील वनसंपदा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पवनऊर्जा प्रकल्पाच्या भिरभिरणाऱ्या पात्यांचा आवाज आणि बेकायदा शिकारीचे वाढते प्रमाण वन्यप्राण्यांच्या जीवनावर उठल्याने सैरभैर झालेल्या वन्य पशुपक्ष्यांनी आपली पावले मानवी वस्तीकडे वळवली आहेत. दरम्यान, फटाके फोडूनच शेतकरी शेतात जात आहेत.सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांची हद्द म्हणजे पाटण तालुक्यातील वाल्मीक पठार! ढेबेवाडीपासून पश्चिमेला सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या पठाराच्या एका बाजूस चांदोली अभयारण्य तर दुसऱ्या बाजूस कोयना अभयारण्य आहे. अनेक वर्षांपासून हिरवीगार झालर पांघरलेल्या या वाल्मीक पठारावर आणि जंगलात मोठ्या प्रमाणावर पट्टेरी वाघ, बिबट्या, अस्वले, गवे, डुकरे, साळिंदर, कोल्हे आदी जंगली प्राण्यांसह पक्ष्यांचीही वर्दळ असल्याचे वनविभागाकडे नोंद असायचीया वाल्मीकच्या जंगलाची आणि तेथील पशुपक्ष्यांची संख्या कमालीची घटत चालली आहे. त्यामुळे वाल्मिक केवळ नावापुरतेच राहणार का ? असा प्रश्न पशुपक्षी तज्ज्ञांसह निसर्गमित्रांना भेडसावत आहे. (वार्ताहर) गवे-रानडुकरांचा शेतातच मुक्काम४विभागातील शेतकऱ्यांत वन्य प्राण्यांची कमालीची दहशत पसरली आहे. शेतात पिके मोठी झाल्याने गवे, रानडुकरांचे कळप शेतातील जुन्या राहुटीत राहू लागलेत. शेतात काम करताना अचानक अशा प्राण्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी आता नवा फंडा शोधला आहे. शेतात प्रवेश करताना फटाके फोडायचे. ज्यामुळे त्याच्या आवाजाने शेतातील प्राणी धूम ठोकतात. वन्यप्राणी आणि वनसंपदेची जबाबदारी जरी वनविभागाची असली तरीसुध्दा सुज्ञ नागरिकांनी चोरट्या शिकारीची चाहूल लागताच आमच्याशी संपर्क साधल्यास चोरट्या शिकाऱ्यांचा बंदोबस्त करणे सोपे जाईल. - किरण कांबळे, वनक्षेत्रपाल