शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणेत स्फोट; कोरेगावात आग

By admin | Updated: February 7, 2015 00:09 IST

कामगार ठार : दोन्ही आगीत कोट्यवधींचे नुकसान; हिंगणे परिसर हादरला

वडूज / कोरेगाव : माण तालुक्यातील बोथे येथील जिलेटिन स्फोटाच्या आठवणी ताज्या असतानाच खटाव तालुक्यातील हिंगणे परिसर आज, शुक्रवारी आणखी एका स्फोटाने हादरून गेला. येथे एका बायोडिझेल निर्मिती कारखान्यात लागलेल्या आगीनंतर झालेल्या स्फोटात सागर कृष्णा जगदाळे हा कामगार जागीच ठार झाला. दरम्यान, कोरेगावातही आज एका हँडलूम अँड फर्निचर दुकानात आगीचे तांडवनृत्य सुरू राहिले. दोन्हीही आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले. हिंगणे येथे ‘खटाव-माण अ‍ॅग्रो प्रोसेसिंग’ हा बायोडिझेल तयार करणारा खासगी कारखाना असून, येथे कंपनीच्या टाकीला भीषण आग लागल्याने मोठा स्फोट झाला. यामध्ये येथे वेल्डिंग काम करणारा कामगार सागर कृष्णा जगदाळे (वय २७, रा. राजाचे कुर्ले) हा जागीच ठार झाला. हिंगणे येथील आगीनंतर झालेल्या स्फोटामुळे परिसर हादरला. यानंतर येथे लोकांची गर्दी वाढली. पोलीस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आग रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. ती आटोक्यात आणताना अग्निशमन दलालाही कसरत करावी लागत होती. दरम्यान, या आगीत कारखान्याचे कोट्यवधींचे नुकसान झाले. घटनास्थळी आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे यांनी भेट दिली आणि आढावा घेतला.कोरेगावात जयराम डोंबे यांच्या ‘यश हँडलूम अँड फर्निचर’ दुकानाला लागलेल्या आगीत सहा ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, घटनास्थळी गर्दी झाल्याने पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली होती. सागर जगदाळे दोनशे मीटर बाजूला फेकले गेलेहिंगणे येथील कारखान्यात सागर जगदाळे हा वेल्डिंग कामगार होता. येथील सहापैकी एका टाकीवर तो वेल्डिंगचे काम करीत होता. प्राथमिक अंदाजानुसार ही आग वेल्डिंगच्या ठिणगीने लागली असल्याची माहिती पुढे येत आहे. आग लागल्यानंतर झालेल्या स्फोटात टाकीच्या झाकणासह सागर जगदाळे हे दोनशे मीटर बाजूला फेकले गेले आणि त्यातच ठार झाले.रात्री उशिरा तिसरा स्फोटहिंगणे येथे रात्री उशिरा तिसरा स्फोट झाला. कऱ्हाड येथील नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पाचारण करण्यात आले; मात्र प्रयत्न करुनही आग आटोक्यात येत नव्हती.