शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ विस्तारवाढीसंदर्भात भूमिका स्पष्ट करा

By admin | Updated: May 19, 2015 00:32 IST

नामदेव पाटील : कऱ्हाडात विस्तारवाढ बाधित समितीची प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा

कऱ्हाड : ‘सध्याच्या शासनाची विस्तारवाढीसंदर्भातील भूमिका स्पष्ट होत नसल्याने त्यांच्याकडून नक्की विमानतळ विस्तारवाढ केली जाणार आहे की नाही, हे अद्याप समजू शकलेले नाही. सरकार जर विमानतळ विस्तारवाढ करणार असेल, तर त्यासंदर्भात त्यांनी तत्काळ जमिनीचा दर स्पष्ट करावा, तसेच विमानतळ विस्तारवाढीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असे प्रतिपादन कऱ्हाड विमानतळ विस्तावरवाढ बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी केले.कऱ्हाड येथे सोमवारी कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे, सचिव अ‍ॅड. शिवाजी पाटील, अ‍ॅड. प्रकाश चव्हाण, शिवाजी धुमाळ, भास्करराव धुमाळ, जगन्नाथ पाटील, राजेंद्र पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र शिंदे, जनार्दन पाटील, बाबासाहेब शिंदे, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते.कऱ्हाड विमानतळ विस्तारवाढ बाधित शेतकरी समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी किशोर पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वारुंजी, केसे, मुंढे, विजयनगर या गावांतील विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. प्रांताधिकारी यांच्याशी विमानतळ विस्तारवाढसंदर्भातील शासनाची नेमकी कोणती भूमिका आहे. जमिनीच्या दराबाबत शासन केव्हा निर्णय घेणार आदीविषयी विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांनी चर्चा केली. विमानतळ विस्तारीकरण, जमिनीचे दर, अशा विषयावर विस्तारवाढ बाधित समितीच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी समितीतर्फे दिलेल्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासनाने कऱ्हाड विमानतळ हद्दवाढप्रक्रिया सुरू केलेली आहे. शासनाकडून विस्तारवाढीची मोजणीप्रक्रिया पूर्ण झाली आहे. विस्तारवाढीसंदर्भात संघटनेने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी जमिनीस प्रतिगुंठा तीन लाख पन्नास हजार रुपये अशी दराविषयी चर्चा झाली होती. त्याप्रमाणे विस्तारवाढ बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी प्रतिगुंठा दहा लाखांप्रमाणे विमानतळ विस्तारवाढ करण्यासाठीची मागणी केली होती. मात्र, तो प्रश्न प्रलंबित राहिला. (प्रतिनिधी) अन्यथा आत्मदहन करू...सध्या सरकारच बदलले असल्याने विमानतळ विस्तारवाढीबाबत शेतकऱ्यांची संभ्रमावस्था झाली आहे. शासनाकडून देखील योग्य निर्णय घेतला जात नसल्याने त्यांच्या धोरणासंदर्भात शेतकरी अनभिज्ञ आहेत. तरी शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा शेतकऱ्यांना आत्मदहन अथवा आठ दिवसांत उपोषण या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.