शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

हद्दपार झाला छकडा.. अन् कोपऱ्यात हातगाडा!

By admin | Updated: November 30, 2015 01:18 IST

आधुनिकीकरणामुळे उपासमार : सातारा शहरात उरले फक्त चार गाडे

जावेद खान-- सातारा--स्वातंत्र्यपूर्व काळ आठवला तर त्यावेळी वाहतुकीच्या साधनांची फारशी सोय नव्हती. प्रवाशी वाहतुकीसाठी घोडागाडी अन् मालवाहतुकीसाठी हातगाड्या असायच्या. आता जमाना बदलला आहे. पूर्वी शान समजल्या जाणाऱ्या घोडागाड्या आता केवळ पर्यटनस्थळी रपेट मारण्यासाठी वापरल्या जात आहेत. आधुनिकीकरणामुळे छकडे हद्दपार झाले आहेत तर पूर्वी मालवाहतूक करणाऱ्या हातगाड्याही कोपऱ्यात पडलेल्या पाहायला मिळत आहेत. ब्रिटिशकाळात साहित्यांची ने-आण करण्यासाठी हातगाडा, छकडा याशिवाय पर्याय नव्हता. स्वातंत्र्योत्तर काळातही हातगाडे, घोडागाडी बरीच वर्षे शहराच्या ठिकाणी पाहायला मिळत होती. मात्र वाहननिर्मिती क्षेत्रात वाढ झाल्याने अनेक कंपन्यांनी मालवाहतुकीबरोबरच प्रवाशी वाहतुकीच्या सोयीसाठी अनेक प्रकारची वाहने बाजारात आणली आहेत, ज्यामुळे काम सोपे झाले आहे. हातगाड्यांच्या जागी आता छोटी आधुनिक वाहने आली आहेत. त्यामुळे जुनी साधनं काळाच्या पडद्याआड चाललेली आहे.साताऱ्यात होते शेकडो हातगाडेब्रिटिशकाळापासून सातारच्या मुख्य बाजारपेठेत जवळपास शंभरहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या हातगाड्यांची संख्या होती. कामगार हातगाड्या, छकड्यांच्या साह्याने रात्रंदिवस काम करायचे. खासकरून बसस्थानक व रेल्वे स्थानकात हातगाडे दिसायचे. रोजगाराची ही मोठी केंद्रे असल्यामुळे मालवाहतूक करण्याची वर्दी हमखास मिळायची. कष्ट जास्त, मोबदला कमीसातारा शहराची भौगोलिक रचना चढ-उताराची आहे. अशा भागात हातगाडी चालविणे मोठे कष्टाचे असते. मात्र कष्टाच्या बदल्यात मिळणारा मोबदला फारच कमी असल्यामुळे कामगारांची आर्थिक स्थिती सुधारणे अवघड असल्याचे चाळीस वर्षांपासून हातगाडा ओढण्याचे काम करणारे आनंद दोरके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बिले, परवाने देणे बंदपूर्वी वाहतूक शाखेकडून हातगाडाधारकांना बिले दिली जायची. त्याच्या नूतनीकरणाचा कालावधी २-३ वर्र्षाचा कालावधी होता. २० ते ३० रूपयांत हे नूतनीकरण होत होते. १९९५-९६ मध्ये हातगाड्यांचे शेवटचे नूतनीकरण झाले. तेव्हापासून बिले, परवाने देणे बंद झाले आहे.हातगाड्यांना अजूनही मागणीजवळची मालवाहतूक करण्यासाठी अजून हातगाड्यांना मागणी आहे. सातारा शहरात मजूर अड्ड्यावर काही हातगाडे पाहायला मिळतात. भाजीपाला, नारळाची पोती, गाद्या, टिकाऊ वस्तंूचे बॉक्स, बांधकामाचे स्टील, कपाटे अशा वस्तू दुकानातून घरापर्यंत नेण्यासाठी हातगाड्यांचा वापर होताना दिसतो. तसेच गोडावूनमधील माल दुकानापर्यंत नेण्यासाठीही हातगाडी वापरली जाते. कमी पैशात ही वाहतूक होत असल्याने आजही त्याला मागणी आहे.