शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलांचे रक्षण करण्याची प्रत्येकाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:36 IST

बेलवडे खुर्द, ता. पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वन वणवा विरोधी जनजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनपाल ...

बेलवडे खुर्द, ता. पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वन वणवा विरोधी जनजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनपाल एस. बी. भाट, आनंदा जाधव, वनरक्षक वर्षाराणी चौरे, सावंता लोखंडे उपस्थित होते.

मुख्याध्यापक अनिल मोहिते म्हणाले, पाटण तालुका जैवविविधतेने नटलेला आहे. तालुक्यात विपुल प्रमाणात वनसंपदा असून काही समाजकंटक गैरसमजुतीतून वणवे लावत आहेत. त्यामुळे जंगले जळून खाक होत आहेत. दुर्मीळ वनौषधी वनस्पती नष्ट होत आहेत. सुक्ष्म जीव, पशु, पक्षी यांचा बळी जात आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व जाणले पाहिजे. अन्नसाखळीतील प्रत्येक प्राण्याचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. निसर्ग ही एक खूप मोठी शक्ती आहे. निसर्ग आपणास भरभरून देत असतो. मानवाकडून मात्र निसर्गाला विविध प्रकारे ओरबडण्याचे काम सुरू आहे. पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती यांना बाधा येईल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये. पर्यावरण रक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना वन वणवा विरोधी शपथ देण्यात आली. वणवा लावणाऱ्याला वन कायद्यानुसार दोन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. वणवा लागल्यास वन विभागास कळवा. तसेच तो आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शंकर सुतार यांनी प्रास्तविक व स्वागत केले. जागृती कासार यांनी आभार मानले.

फोटो : १३केआरडी०३

कॅप्शन : बेलवडे खुर्द, ता. पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वन वणवा विरोधी जनजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी वनक्षेत्रपाल विलास काळे यांचे भाषण झाले.