मुख्यमंत्र्यांच्या 'बॅडबूक'मध्ये गेल्यावर काय होतंय ते सर्वांना माहीतच आहे, महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:03 IST2025-11-26T14:02:19+5:302025-11-26T14:03:31+5:30
Local Body Election: सोनगीरवाडी येथील सभेत टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांच्या 'बॅडबूक'मध्ये गेल्यावर काय होतंय ते सर्वांना माहीतच आहे, महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिला इशारा
वाई : ‘कोणाच्याही दहशतीला बळी पडू नका, कोणी दम दिला तर मला किंवा शिवेंद्रराजेंना सांगा, येथे कायद्याचे राज्य आहे. आम्ही कायद्याने चालणारी माणसं आहोत. कोणी दमदाटी करत असेल तर पोलिस, शासकीय यंत्रणा कडक कारवाई करेल. दम देणाऱ्यांना देवाभाऊ घरी बसवतील. आपण देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुड बुक’मध्ये आहोत. ‘बॅड बुक’मध्ये गेल्यावर परिणाम काय होतो तुम्हाला माहिती आहे,’ असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
सोनगीरवाडी वाई येथे मंगळवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपा नेते मदन भोसले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत यांची भाषणे झाली. यावेळी अशोकराव गायकवाड, धैर्यशील कदम, सुरभी भोसले, आनंदराव पाटील, सुनील कटकट, दीपक ननावरे उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, ‘सध्या केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाचे सरकार आहे. पंतप्रधान मोदी यांनी शहर विकासासाठी व छोटी छोटी शहरे विकासासाठी ५५ प्रकारच्या विकास योजना आणल्या आहेत.’
यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ‘वाईमध्ये बदलाचे वारे फिरत आहेत. वाईमध्ये पर्यटन, उद्योगामध्ये दिशादर्शक विकास करून रोजगार निर्मिती होण्यासाठी परिवर्तन महत्त्वाचे आहे. शहराध्यक्ष, विजय ढेकाने यांनी आभार मानले.