शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या तोंडावरही सहा धरणांत ४५ टीमएमसी साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षी सतत झालेल्या पावसामुळे आजही सर्वच प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत पश्चिमेकडील प्रमुख ६ ...

सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षी सतत झालेल्या पावसामुळे आजही सर्वच प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत पश्चिमेकडील प्रमुख ६ धरणांमध्ये ४५.०८ टीमएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे या वर्षीही आतापासून चांगला पाऊस सुरू झाल्यास धरणे लवकरच भरू शकतात. तर सध्या कोयनेत २९, उरमोडीत ६, धोम ५ तर तारळी धरणात ३ टीएमसीच्या आसपास पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हरफुल्ल होत आहेत. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून अनेक वेळा पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झालेला. दोन वर्षांपूर्वी कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा नदीपात्र सोडून वाहत होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या गावांत आणि शेतात पाणी जाऊन मोठे नुकसान झाले होते. आताही पावसाळा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. पण, काही भागांत पाऊस अत्यल्प पडलेला आहे. परिणामी पेरण्या रखडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे तलाव, धरणांत पाणीसाठा वाढू शकतो. तसेच धरणे लवकर भरली जातील, असा अंदाज आहे.

जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्या वर्षी या वेळी या धरणात ४९.३८ टीएमसी पाणीसाठा होता. तर या वर्षी तो ४५.०८ टीएमसी इतका आहे. त्यामुळे अजूनही पाणीसाठा बऱ्यापैकी टिकून आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणातही अजूनही २८.७१ टीएमसी साठा आहे. म्हणजेच या धरणात अजूनही जवळपास २७.२८ टक्के पाणी आहे. त्याचबरोबर इतर धरणांमध्येही चांगला पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)

धरणे या वर्षी गतवर्षी एकूण क्षमता यावर्षीची टक्केवारी

धोम ४.९५ ५.४९ १३.५० ३६.६७

कण्हेर २.१८ २.१७ १०.१० २१.५९

कोयना २८.७१ ३२.७० १०५.२५ २७.२८

बलकवडी ०.७० १.०७ ४.०८ १७.१०

उरमोडी ५.७४ ५.७५ ९.९६ ५७.२७

तारळी २.८० २.२० ५.८५ ४७.९२

....................................................