शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतिय व्यापाऱ्यांचे अतिक्रमण

By admin | Updated: November 9, 2014 23:26 IST

नागरिकांमधून नाराजी : सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

सावंतवाडी : शहरात परप्रांतिय व्यापाऱ्यांची संख्या वाढत चालली असून विक्रीसाठी शहरातील विविध ठिकाणच्या जागांवर त्यांचे अतिक्रमण होत आहे. मात्र, याकडे पालिकेने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. परप्रांतिय व्यापाऱ्यांच्या तुलनेत स्थानिक व्यापाऱ्यांकडून जागेचे भाडे दररोज वसूल केले जाते. स्थानिक व्यापाऱ्यांवर कडक नजर ठेवली जाते, तर परप्रांतियांकडे पालिकेने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सावंतवाडी शहरात परप्रांतिय व्यापाऱ्यांची मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. झोपाळे, चादरी, कपडे, स्वेटर, फळे अशा प्रकारच्या सर्वच वस्तूंची विक्री परप्रांतिय व्यापारी बिनधास्तपणे फुटपाथवर अथवा इतर सार्वजनिक ठिकाणांवर बसून करतात. याचा त्रास फुटपाथवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना सहन करावा लागतो. मोती तलावाकाठी अनेक परप्रांतिय व्यापारी बिनधास्तपणे, कोणतेही शुल्क न भरता व्यापार करताना दिसतात.याबाबत नगरपलिका अशा व्यापाऱ्यांना कोणत्याही सूचना देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु एखादा स्थानिक व्यापारी अशाप्रकारे विक्रीस बसल्याचे आढळून आल्यास तत्काळ पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या मागे ससेमिरा लागतो आणि त्याच्याकडून दंड आकारला जातो. (वार्ताहर)पालिकेच्या धोरणावर नाराजीनियमाप्रमाणे मार्केटमध्ये बसून व्यापार करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यालाही शुल्क भरावे लागते. तर परप्रांतिय सावंतवाडी शहरात कोठेही बिनधास्तपणे ‘बिनभाड्याचा’ व्यापार करीत आहेत. त्यामुळे ‘स्थानिकांवर वक्रदृष्टी आणि परप्रांतियांवर कृपादृष्टी’ असे पालिकेचे धोरण दिसत असल्याचे सूर स्थानिक व्यापाऱ्यांतून उमटत आहेत. याची नोंद घेऊन स्थानिक आणि परप्रांतिय व्यापाऱ्यांना एकच न्याय द्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांतून होत आहे.