शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खोजेवाडी ग्रामपंचायतीकडून विकासकामांमध्ये लाखोंचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST

नागठाणे : खोजेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणीत सुमारे १७.६६ लाख रुपयांच्या व्यवहारात अनियमितता आढळून आली असून, याबाबत ग्रामपंचायतीस नोटीसही ...

नागठाणे : खोजेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणीत सुमारे १७.६६ लाख रुपयांच्या व्यवहारात अनियमितता आढळून आली असून, याबाबत ग्रामपंचायतीस नोटीसही देण्यात आली आहे. हा सर्व व्यवहार सत्ताधारी गटाचे सरपंच, ग्रामसेवक व त्यांच्या सदस्यांनी त्यांच्या पुढाऱ्यांच्या दबावाखाली केला आहे. यामध्ये गावातील ग्रामस्थांचीही दिशाभूल केली जात आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून सरपंचांनी राजीनामा द्यावा व ग्रामसेवक व सरपंचांनी सर्व रक्कम भरावी, अशी मागणी अपशिंगेचे पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे यांनी केली.

खोजेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विरोधी गटाचे संतोष कृष्णा साळुंखे, वंदना घोरपडे, बेबीताई मदने व सुहासिनी कोळी हे ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते.

संजय घोरपडे म्हणाले, ‘सत्ताधारी गटाच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांनी १७ जून २०१९ ते ११ ऑगस्ट २०२१ या काळात ग्रामपंचायतीने बरेच अनियमित आर्थिक व्यवहार केले. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यावरूनच मनामानी पद्धतीने कारभार केला. त्यांनी गावातील ग्रामस्थांनाही याबाबत अंधारातच ठेवले. ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराची माहिती विरोधी सदस्यांनी दिल्यावर आपण सातारा पंचायत समितीच्या सभेत खोजेवाडी ग्रामपंचायतीत होत असलेल्या आर्थिक घोटाळ्याची माहिती देऊन चौकशीची व दप्तर तपासणीची मागणी केली होती.’

‘गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ समिती नेमून या ग्रामपंचायतीची दोनवेळा दप्तर तपासणी केली. तपासणीत त्यांना सुमारे १७.६६ लाख रुपये इतकी आर्थिक व वित्तीय अनियमितता आढळून आल्यानेच त्यांनी नोटीस बजावून या आर्थिक व वित्तीय अनियमितताच्या संशयित अपहारास खोजेवाडीच्या विद्यमान सरपंच अरुणा जाधव, उपसरपंच राहुल डांगे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक बी. डी. बोभाटे हे जबाबदार राहतील, असे नमूद करून सात दिवसांत पूर्ततेसह खुलासा करावा अन्यथा खातेनिहाय कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे. या गैरव्यवहारासंदर्भात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मुद्दा उपस्थित करून सरपंचांना राजीनामा द्यावा, अशी मागणी करताच सत्ताधाऱ्यांनी ग्रामसभाच गुंडाळली. दरम्यान, प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची घटना ग्रामपंचायतीकडून घडली असतानाही सरपंचांनी अरेरावीची भाषा वापरून ग्रामस्थांना वेठीस धरून वेळ मारून नेण्याचे काम केले होते,’ असे संजय घोरपडे यांनी सांगितले.

चौकट :

खोजेवाडी येथील ग्रामसेवक बी. डी. बोभाटे, सरपंच अरुणा जाधव, उपसरपंच राहुल डांगे तसेच सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी अपहार केलेला आहे. गावातील पंधरा बचत गटांतून प्रेरक म्हणून काम करताना सरपंच यांनी त्यामध्येही लाखोंचा अपहार केलेला आहे. यामुळे सरपंच पदाचा राजीनामा देऊन अपहार केलेली रक्कम ग्रामपंचायतीच्या खाते वर्ग करावी.

- संतोष साळुंखे,

सदस्य, ग्रामपंचायत, खोजेवाडी

चौकट :

विरोधी सदस्यांनी राजकारण करून गावामध्ये राजकीय वातावरण निर्माण केले आहे. अशा गैरव्यवहाराची आम्हास कल्पनाही नाही? तसेच याबाबत जनतेसमोर येऊन लवकरच विरोधकांनाही उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत.

- राहुल डांगे,

उपसरपंच, खोजेवाडी.