शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठही मतदारसंघांत ‘आप’चा शड्डू

By admin | Updated: July 3, 2014 00:48 IST

जिल्हा कार्यकारिणीकडून मते मागविली : पंधरा दिवसांत यादी जाहीर होणार

सातारा : आगामी विधानसभा निवडणुकीत ‘आम आदमी पार्टी’ महाराष्ट्रात उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते; मात्र जिल्हा संयोजक आणि स्वयंसेवकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय बदलला आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे पंधरा दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
पक्षाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयाकडून प्रत्येक जिल्हा संयोजक आणि जिल्हा सचिवांना मेल पाठविण्यात आला असून त्यामध्ये काही मुद्यांवर चर्चा करण्यास सांगितले आहे. त्याचा अहवालही पाठवून देण्याची सूचना केली असल्याची माहिती ‘आप’चे जिल्हा सचिव सागर भोगावकर यांनी दिली.
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि सहकाऱ्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अनेकांचे पानिपत करत सत्ता काबीज केली. मात्र, केजरीवालांनी राजीनामा दिला आणि लगेच लोकसभा निवडणूक जाहीर झाली. मात्र, पंजाबमधील चार जागा वगळता इतरत्र ‘आप’चा सफाया झाला. महाराष्ट्रात ‘आप’ विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा संयोजकांनी नाराजी व्यक्त केली आणि पक्षनेतृत्वाने यावर विचार करावा, असा मुद्दा मांडण्यात आला. परिणामी, महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यातही विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
यानंतर बुधवारी जिल्हा कार्यकारिणीला एक मेल पाठविण्यात आला असून त्यामध्ये काही माहिती भरून देण्याची सूचना करण्यात आली आहे. उमेदवार कोण असावा, प्रचाराचे मुद्दे काय राहतील, उमेदवाराविषयी असणारी मते, त्याचे सामाजिकदृष्ट्या असणारे स्थान याचाही विचार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)