शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादी चक्रव्यूहात

By admin | Updated: September 15, 2014 23:26 IST

जयकुमार गोरे : नूतन उपसभापती अतुल जाधव यांचा सत्कार

खटाव : माण तालुका पंचायत समिती पदाधिकारी निवडीमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि आ. जयकुमार गोरे यांनी टाकलेल्या चक्रव्यूहात राष्ट्रवादी अलगद अडकल्याने एक सदस्य अनुपस्थित असूनही काँग्रेसच्या अतुलशेठ जाधव यांची उपसभापतिपदी निवड झाली. आ. गोरेंच्या खेळीने जिल्हा परिषद सदस्य अनिल देसार्इंची विकेट निघाली, तर माजी आ. सदाशिव पोळ यांना विचारात पाडले. काल, रविवारी घडलेल्या घडामोडींमुळे काँग्रेसने एका दगडात अनेक पक्षी मारल्याचीच चर्चा रंगली आहे.माण पंचायत समितीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी पाच सदस्य निवडून आले आहेत. सभापतिपदी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची वर्णी लागली. काँग्रेसचे एक सदस्य अनुपस्थित असल्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. उपसभापतिपदीही तशीच परिस्थिती राहील, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र, उपसभापती निवडीत राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळीने उचल खाल्ली. राष्ट्रवादीच्या एका सदस्याला काँग्रेसच्या सदस्याने सुचक म्हणून सही केली होती. उपसभापती निवडीत मदत करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या त्या सदस्याने दिले होते. मात्र, व्हायचे तेच झाले. ऐनवेळी शब्द फिरवण्यात आला. तिथेच काँग्रेसच्या सदस्यांनी मुत्सद्देगिरी दाखविली. उपसभापती निवडीत काँग्रेसच्या चार व राष्ट्रवादीच्या एका महिला सदस्याने अतुल जाधवांच्या पारड्यात मत टाकले. आ. जयकुमार गोरेंनी टाकायचा म्हणून टाकलेल्या चक्रव्यूहात राष्ट्रवादी अलगद अडकली. काँग्रेसला उपसभापतिपदाची संधी मिळाली. ज्या सदस्याने स्वत:ची पोळी भाजण्यासाठी सर्वाधिक हालचाली केल्या त्याच राष्ट्रवादीच्या सदस्यांना तोंडघशी पडावे लागले.काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित असूनही अतुल जाधव यांची उपसभापतिपदी निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या निवडीबाबत आ. गोरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, ‘आमचा पराभव आम्ही पूर्वीच मान्य केला आहे. या पदाधिकारी निवडीमध्ये आम्हाला स्वारस्यही नव्हते; मात्र समोरून विनाकारण डाव खेळले गेले. विरोधकांच्या अंतर्गत बंडाळीमुळेच राष्ट्रवादी आमच्या चक्रव्यूहात अडकली. उपसभापतिपदी निवड झालेल्या अतुल जाधव यांचा आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आ. गोरेंच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.कार्यक्रमास अर्जुन काळे, सोमनाथ भोसले, जिल्हा परिषद सदस्या शीला पोळ, मीनाक्षी काळे, पंचायत समिती सदस्या स्मिता वायदंडे, बाबासाहेब हुलगे, सुवर्णा पवार, आनंदराव वीरकर, राजू पोळ, प्रशांत वायदंडे, प्रताप भोसले, सुभाषशेठ जाधव, लुनेश वीरकर, रमेश कदम, मालोजी मोरे, झुंजारशेठ जाधव, युवक अध्यक्ष सतीश जाधव, धनंजय साळुंखे, दत्ता देशमाने, सरपंच धनाजी जाधव, बाळासाहेब कोळेकर, रवी सकुंडे, संदीप जाधव, विजय जाधव, सयाजी मोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)