शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न सत्यात उतरणार

By admin | Updated: September 23, 2014 00:14 IST

माणिकराव साळुंखे : भाऊराव पाटील जयंती सोहळ्यात दिली माहिती

सातारा : शाहू-फुले-आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्था निर्माण केली. कर्मवीरांनी पाहिलेले ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न संस्थेच्या शताब्दीपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत आशादायक घटना आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. रावसाहेब शिंदे होते. यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. अनिल पाटील, प्राचार्य आर. के. शिंदे, शहाजी डोंगरे, अ‍ॅड. के. व्ही. पाटील, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, प्राचार्य नानासाहेब गायकवाड उपस्थित होते.डॉ. साळुंखे म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्था ही भारतीय शिक्षण व्यवस्थेची मातृसंस्था असून देशाच्या प्रगतीचा दर ठरविण्याचे पायाभूत कार्य कर्मवीर अण्णांच्या कार्यामुळे घडले. शिक्षण हे नाविन्याचा शोध घेणारे असावे. केवळ माहिती देणारे शिक्षण पुरेसे नसून कौशल्यावर आधारित शिक्षणपद्धती असावी.’अ‍ॅड. शिंदे म्हणाले, ‘संस्थेने विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. बीपीओच्या माध्यमातून तसे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. तोच रयत शिक्षण संस्थेचा गाभा असून भविष्यात ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना असे शिक्षण दिले जाणार आहे.’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव प्राचार्य गणेश ठाकून यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. सहसचिव प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)