शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकरांमुळे माणूसपण मिळाले

By admin | Updated: November 8, 2015 23:40 IST

तुलसीदास गडपायले : साताऱ्यात शाळा प्रवेश दिन साजरा

सातारा : डॉ. आंबेडकरांनी देशाचा आणि देशातील प्रत्येक माणसाच्या उन्नयनाचा विचार करणारे संविधान भारताला दिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने माणासला ‘माणूसपण’ मिळाले. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि विज्ञाननिष्ठा ही तत्त्वमूल्ये संविधानाने दिली. ही महत्त्वपूर्ण आहेतच; परंतु शिक्षणासंबंधी संविधानात धरलेला सक्तीचा आग्रह खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपण नीटपणे समजून घेतले पाहिजेत,’ असे विचार भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक तुलसीदास गडपायले यांनी व्यक्त केले.सातारा येथे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर होते. तर प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्रतापसिंह हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. जी. मुजावर व सोहळ्याचे आयोजक अरुण जावळे यांची उपस्थिती होती.माणसाला माणसाने माणसासारखे वागवले पाहिजे. हा मानवतेचा तथागत गौतम बुद्धांचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला. हा संदेश केवळ विशिष्ट समाजसमूहासाठी नाही तर अखिल विश्वासाठी दिला आहे. अशा महामानवाचे शिक्षण ज्या हायस्कूलमध्ये झाले, त्या शाळेत आपल्याला आज विचारमंथन करता येते आहे, हा एका अर्थाने डॉ. आंबेडकरांच्या क्रांतीचा विजय आहे, असे गडपायले म्हणाले. डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साताऱ्यातील शाळा कालखंडातील सामाजिक स्थितीचा अभ्यास व त्यावर संशोधन झाले पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिले आहे, ते जगातील सर्व देशांतील राज्यघटनांपेक्षा कितीतरी पटीने सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या इथल्या शाळेतून नेमकी त्यांना कशी ऊर्जा मिळाली, हेही आपण शोधून काढले पाहिजे, असेही डॉ. पाटणकर म्हणाले.अरुण जावळे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतून हा दिवस शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गणेश भिसे यांनी आभार मानले. मुंबई, पुणे, अमरावतीसह अनेक भागांतील लोक उपस्थित होते. (प्रतिनिधी) शाळा, महाविद्यालयांतही उदंड प्रतिसादजिल्हा परिषद शिक्षण विभागाने केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यायांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.