शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बी दणाणली... आम्ही नाही पाहिली!

By admin | Updated: September 13, 2014 00:01 IST

जिल्ह्यात दहाच यंत्रे : दोन वर्षांत एकही गुन्हा नाही; तीन पोलीस ठाण्यांमागे एक यंत्र

नितीन काळेल / साताराध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी डॉल्बीचा आवाज किती डेसिबलपर्यंत आहे याच्या मापनासाठी असणारे नियम सरसकट पाळले जात नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यातच अलीकडील दोन वर्षांत जिल्ह्यात ध्वनीची मर्यादा ओलांडल्याने एकाही डॉल्बीधारकांवर गुन्हा नोंद झाला नाही. त्यातच जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक डॉल्बी दणाणत असतात; पण त्याच्या मापनासाठी पोलिसांकडे ध्वनिमापन यंत्रणा कमी आहे. जिल्ह्यात फक्त १० यंत्रे उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठे-कुठे जायचे असा प्रश्न पोलिसांना पडत आहे. साताऱ्यात राजपथावरील एक जीर्ण इमारत कोसळली. ही घटना गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी घडली. त्यामुळे डॉल्बीच्या दणदणाटामुळे ही इमारत कोसळली असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे डॉल्बीधारकांवर कारवाईची मागणी पुढे येऊ लागली आहे. सातारा शहर पोलिसांनी अशा २५ जणांवरील कारवाईचे प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षकांडे पाठविले आहेत. यामुळे संबंधितांवर काय कारवाई होणार आहे, हे पुढेच ठरणार आहे. एकंदरीत ध्वनिप्रदूषणाच्या कारवाईबद्दल काही नियम आहेत, ते पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. ध्वनीची मर्यादा कितीपर्यंत असावी ती दिवसा किती व रात्री कितीपर्यंत असावी असा एक नियम आहे. त्यानुसार औद्योगिक क्षेत्रात ७५-७० डेसिबल, वाणिज्य ६५-५५, निवासी ५५-४५ आणि शांतता क्षेत्रात ५०-४० असावी असा एक नियम आहे. पण, साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी ही मर्यादा मोठ्या प्रमाणात डावलण्यात आली हे विशेष आहे. कारण साताऱ्यात सुरू असणाऱ्या डॉल्बीचा दणदणाट ११८ डेसिबलपर्यंत गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे २५ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, पाटण अशा मोठ्या शहरांत विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट असतो. पण त्यासाठी ध्वनिमापन यंत्रणा पोलिसांकडे अपुरी आहे. जिल्ह्यातील पोलिसांसाठी फक्त दहाच यंत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे विचार करायला गेले तर ३ पोलीस ठाण्यांमागे एक यंत्र अशीच स्थिती आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याकडेही एकच यंत्र आहे. त्यावर संपूर्ण सातारा शहरातील डॉल्बीचे मापन होते. म्हणजेच एक यंत्र शहरात कोठे-कोठे घेऊन जायाचे असा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यामुळेच गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक डॉल्बीधारकांवरही कारवाई होऊ शकली नाही, हे वास्तवही नुकतेच समोर आले आहे.