शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला भेट भेसळयुक्त पदार्थांची!

By admin | Updated: November 2, 2015 23:56 IST

प्रशासन सुस्त : मसूर परिसरात खाद्यपदार्थ, तेलात भेसळ होत असल्याचा ग्राहकांचा आरोप

मल्हारपेठ : किराणा मालाचे दुकान, हॉटेल, ढाब्यांवर खाद्यपदार्थ, खाद्यतेलांच्या तसेच बेकरी व्यवसाय करणाऱ्या सर्वच दुकानांमध्ये भेसळयुक्त पदार्थांची सर्रास विक्री होत असताना अन्न भेसळ, औषध प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवसात तरी या सर्व भेसळीला लगाम लागणार का? अगोदरच या सर्व बाबीकडे प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. निव्वळ कागदी आणि जुजबी कारवाई करून अन्न व भेसळ प्रशासन गप्प आहे. पाटण तालुक्यात उत्पादित होणाऱ्या सर्व पदार्थांसह सर्व तेलयुक्त पदार्थांची विक्री होत असते. भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीस शासनाने प्रतिबंध केला असला तरी याची कोणतीच भीती व्यावसायिकांना नसल्याचे जाणवत आहेत. हॉटेल व्यावसायिक, ढाबे, किराणा दुकानदार, वडापावचे गाडे, खाद्य तेलाची दुकाने, बेकरी व्यावसायिक तसेच इतर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्याकडे या आशयांचे परवाने असणे कायद्याने बंधनकारक आहे. तसे परवानेदेखील व्यावसायिकांकडे दर्शनी भागात लटकवलेले दिसतात. हे केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठीच आहेत. सामन्य ग्राहक या बाबींकडे गांभीर्याने कधीच पाहत नाहीत. त्यामुळे या व्यावसायिकांचे फावते, असा आरोप केला जात आहे.सर्वच पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण एवढं प्रचंड आहे की, त्याचे नमुने जर तपासाला पाठवावे म्हटले तर प्रत्येक पदार्थांची बेरीज केली तर तपासणी करण्यास प्रशासनाला सुद्धा या गोष्टी शक्य नाहीत. तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल, ढाबे, खाद्यतेलांची दुकाने, बेकरीवाले तसेच किराणा मालांची दुकाने यांच्यावर करडी नजर ठेवण्यास प्रशासनच विसरले आहे.मोहीम गतिमान करताना दिसत नाहीत. निव्वळ बाजारपेठाच्या ठिकाणी कारवाहीसाठी न येता फक्त भीती दाखविण्यासाठी येतात. भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामाचे काय? याचा मात्र शासनाला विसर पडलाय. यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी अन्न भेसळ प्रशासनाची असताना शासन मात्र उदासीन का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्याच्या भेसळ प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात सणासुदीत तरी ही मोहीम गतिमान करण्याची मागणी होत आहे. परराज्यातून येणाऱ्या उपपदार्थांची तपासणी करणे गरजेचे आहे. शासनाने सर्व पदार्थांच्या पॅकिंगवर पदार्थ सदोष असल्याचा शिक्का लावणे बंधनकारक केले असले तरी ही प्रक्रिया मात्र निव्वळ फार्सच आहे, अशी भावना ग्राहकांची निर्माण झाली आहे. (वार्ताहर)दिवाळीच्या सणाला मोठ्या प्रमाणावर तळण केले जाते. फराळाचा वापर केला जातो. कमी दरात मिळणारी वस्तू भेसळयुक्त असतात. बेसनपीठ, तेल यामध्ये भेसळ झालेली पाहायला मिळते. यासाठी महिलांनीच वस्तू खरेदी करताना खात्री करणे गरजेचे आहे. तरच कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील.- चारुशीला कवर, मूळगाव, ता. पाटणस्वस्तात मिळतात म्हणून भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात वापर झाला तर आरोग्यावर परिणाम होता. रासायनिक मिश्रित भेसळयुक्त पदार्थांचा आरोग्यावर दुष्परिणाम हळूहळू जाणवू लागतो. अनेकदा शाकाहारी असल्याचे भासवून मांसाहाराचा वापर होतो. पचनसंस्थेवर याचे परिणाम होतो.- डॉ. विजय देसाई,नवा रस्ता