जिल्हा क्रिकेट संघाची निवड २२, २३ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:38 IST2021-01-20T04:38:27+5:302021-01-20T04:38:27+5:30

सातारा : जिल्हा क्रिकेट संघाची निवड येत्या २२ व २३ जानेवारी रोजी छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे आयोजित करण्यात ...

District cricket team selection on January 22, 23 | जिल्हा क्रिकेट संघाची निवड २२, २३ जानेवारीला

जिल्हा क्रिकेट संघाची निवड २२, २३ जानेवारीला

सातारा : जिल्हा क्रिकेट संघाची निवड येत्या २२ व २३ जानेवारी रोजी छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ यांनी दिली.

खुला गट १९ वर्षांखालील गट व सोळा वर्षांखालील गट अशा तीन गटांत या स्पर्धा होणार असून, या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघ निवडीसाठी ही चाचणी घेण्यात येणार आहे. विविध गटांसाठी होणाऱ्या या निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी विहित नमुन्यात नोंदणी फी भरून व जन्मतारखेचा दाखला देऊन आपली नावे निश्चित करायचे आहेत. विहित नमुन्यातील अर्ज स्टेडियमवरील ऑफिसमध्ये सायंकाळी ६ ते ८ या वेळेत उपलब्ध होतील, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश साधले यांनी दिली.

Web Title: District cricket team selection on January 22, 23