शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कास-बामणोली रस्ता बंद होणार असल्याच्या चर्चेला उधाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:11 IST

पेट्री : कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, ...

पेट्री : कास धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, तेटलीकडे जाणारी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद करून ती अंधारी-कोळघर-एकीवमार्गे वळविण्याच्या हालचाली संबंधित विभागाकडून सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास स्थानिकांना वेळेसह २० किलोमीटर अधिकचे अंतर कापावे लागणार असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. या निर्णयाविरोधात कास, धावली, बामणोली, तेटली विभागातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त हाेत असून, कास धरणाशेजारूनच तत्काळ पर्यायी रस्ता काढण्याची मागणी होत आहे अन्यथा स्थानिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

सातारा शहरातील नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी कास धरणाची उंची वाढविण्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात व भिंतीच्या कामात कास-बामणोलीकडे जाणाऱ्या प्रमुख महामार्गाचा काही भाग बाधित होत असल्याने धरणाशेजारी पर्यायी रस्ता काढून स्थानिकांचे दळणवळण सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे असताना धरणाच्या कामासाठी परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता, वारंवार रस्ता बंद करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. आता तर चक्क तीन महिन्यांसाठी वाहतूक बंद करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहे. मात्र, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या भागातून सकाळी अत्यावश्यक असणाऱ्या दूध वाहतूक करणाऱ्या गाड्या, रुग्णवाहिका, शाळकरी मुले, दवाखाना व सातारा बाजारपेठेत येणारे प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, हा नजीकचा मार्ग बंद झाल्यास दूध वाहतूक व अत्यावश्यक सेवा बंद होऊन स्थानिकांचे जीवनमान कोलमडेल व त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल. त्यामुळे भागातील दळणवळण सुरळीत सुरु राहण्यासाठी धरणाच्या बांधकामाशेजारूनच पर्यायी मार्ग काढण्याची मागणी होत आहे.

(कोट )

धरणामुळे बाधित होणारा प्रमुख रस्ता धरणाच्या कामाअगोदर पूर्ण करून भागातील सर्वसामान्यांचे जीवनमान अडचणीत येणार नाही, याची दखल घेणे गरजेचे होते. तसे न होता वारंवार रस्ता बंद करून आम्हाला वेठीस धरले जात आहे. आता सर्वप्रथम कास धरणाशेजारूनच पर्याय रस्ता तत्काळ तयार करावा अन्यथा रस्ता बंद केल्यास या भागातून जनक्षोभ उसळून जनता रस्त्यावर उतरेल.

- दिनकर जाधव, ग्रामस्थ, धावली

(कोट)

कोरोनाचे लॉकडाऊन संपल्यानंतर या भागातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कास तलावाशेजारील प्रमुख रस्ता बंद केल्यास व वाहतूक कोळघरमार्गे वळविल्यास २० किलोमीटरहून अधिक अंतर वाढल्याने नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल व भागातील जनजीवन ठप्प होऊन पर्यटन व्यवसायही अडचणी येईल. त्यामुळे कास येथूनच रस्ता व्हावा अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.

- राजेंद्र सपकाळ, ग्रामस्थ, बामणोली

२०सागर चव्हाण