शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा अयशस्वी; घमासानच !

By admin | Updated: April 24, 2015 01:10 IST

उदयनराजे-बाळासाहेब ठाम : ‘जागेचा तह’ यशस्वी करण्यात ‘राम-लक्ष्मण’जोडी निष्प्रभ

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सांगावा घेऊन खासदार उदयनराजेंशी ‘जागेचा तह’ करण्यासाठी लक्ष्मणराव पाटील गुरुवारी सायंकाळी सातारच्या विश्रामगृहावर पोहोचले खरे; वीस मिनिटांच्या चर्चेनंतर लक्ष्मणतात्यांना ताटकळत ठेवून उदयनराजे थेट कऱ्हाडकडे रवाना झाले. तसेच आमदार बाळासाहेब पाटील हेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने कऱ्हाडात ठाण मांडून बसलेले विधान परिषद सभापती रामराजे व आमदार प्रभाकर घार्गे यांची रणनीतीही निष्प्रभ ठरली. दरम्यान, एक दिवस उरलेला असताना गुरुवारीसुद्धा एकही अर्ज मागे घेतला गेला नाही. राष्ट्रवादीतील पक्षाअंतर्गतचा तिढा अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवसापर्यंत कायम राहिला. बारामतीकरांच्या फर्मानानुसार लक्ष्मणतात्यांनी स्वत: उदयनराजेंशी बोलण्यासाठी पुढाकार घेतला. गुरुवारी सकाळपासूनच लक्ष्मणतात्या उदयनराजेंनी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते; पण उदयनराजेंनी त्यांचे फोन स्वीकारले नाहीत. दुपार उलटून गेली तरी हा संपर्क काही केल्या होत नव्हता. अखेर पावणेपाचच्या दरम्यान हा संपर्क झाला. सायंकाळी सव्वापाच वाजता तात्यांनी विश्रामगृहावर येऊन उदयनराजेंशी कमराबंद चर्चा केली. लक्ष्मणतात्यांनी या बैठकीत उदयनराजेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही राष्ट्रवादीच्या पॅनेलसोबतच राहा,’ असा ज्येष्ठतेचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ‘मला बँकेतल्या तीन जागा पाहिजेत. बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाला,’ असे सांगून उदयनराजे तडकाफडकी उठले. ‘एका लग्नासाठी मला जावं लागतंय, तुम्ही बसा, मी परत आलोच,’ असं म्हणून उदयनराजे विश्रामगृहाबाहेर निघून गेले. त्यानंतर सुमारे अर्धा तास लक्ष्मणतात्या विश्रामगृहातील एका दालनात बसून होते. उदयनराजेंचे समर्थक नाना शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी काही काळ तात्यांशी गप्पा मारल्या. त्यानंतर वाट पाहून-पाहून ‘मी निघतो. उदयनराजे परतल्यानंतर मला फोन करा, परत भेटतो,’ असं म्हणून तात्या तिथून निघून गेले. दरम्यान, गुरुवारी सकाळी रामराजेंसह, लक्ष्मणतात्या, आ. मकरंद पाटील, आ. प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, नागरी बँकेतील उमेदवार राजेश पाटील-वाठारकर यांनीही कऱ्हाडात आ. बाळासाहेब पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे उदयनराजे अन् बाळासाहेब यांच्याबाबतीतले दोन्ही प्रयत्न फोल ठरले.