शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकारांना शिस्त लावणार; पण गोडीगुलाबीनं!

By admin | Updated: October 6, 2015 00:22 IST

त्रुटी दूर करू : नूतन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांनी व्यक्त केला निर्धार

 सातारा : ‘कामचुकारांचं आधी गोड शब्दांत समुपदेशन, मग शाब्दिक इशारा, नंतर लेखी इशारा आणि सरतेशेवटी कारवाई, अशी कार्यशैली असेल,’ असे संकेत नूतन जिल्हा शल्यचिकित्सक श्रीकांत भोई यांनी दिले आहेत. जिल्हा रुग्णालयातील त्रुटी आणि कमतरता भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.जिल्हा शल्यचिकित्सकपदाची सूत्रे डॉ. भोई यांनी नुकतीच हाती घेतली आहेत. त्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवेची सद्य:स्थिती, कमतरता, त्रुटी, कार्यपद्धती याविषयी बोलते केले असता ते म्हणाले, ‘उपलब्ध मनुष्यबळ कमी आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची मोठ्या संख्येने गरज आहे. विविध विभागांमध्ये काही कमतरता प्रथमदर्शनी दिसत आहेत. या सर्व बाबी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव पाठविला जाईल. तसेच उपलब्ध मनुष्यबळाकडून कामात कुचराई होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांचे आधी गोडीगुलाबीने समुपदेशन केले जाईल. टप्प्याटप्प्याने समज देत अखेर कारवाईचा बडगा उगारला जाईल.’जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात साठ रुग्णांची सोय आहे. परंतु सद्य:स्थितीत तेथे नव्वदपेक्षा जास्त रुग्ण आहेत. रेडिओलॉजीसह अनेक विभागांमध्ये तज्ज्ञांची कमतरता आहे. उपलब्ध यंत्रसामग्री हाताळण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असता डॉ. भोई म्हणाले, ‘सर्वच विभागांमध्ये काही ना काही कमतरता आहेत; त्रुटी आहेत. ट्रॉमा सेन्टरची योजना केंद्र सरकारची असल्यामुळे ती टप्प्याटप्प्याने उभारण्यात येत आहेत. आतापर्यंत केवळ आठ ते नऊ ट्रॉमा सेन्टरची उभारणी पूर्ण झाली आहे. साताऱ्याचा नंबर कधी लागेल, तेव्हा लागेल; पण विभागवार अत्यावश्यक सुविधांची यादी तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी करण्यात येईल.’गर्भलिंगचिकित्सा रोखण्याच्या दृष्टीने ‘पीसीपीएनडीटी’ कारवाईसाठी सर्व सुविधा जिल्हा रुग्णालयाला पुरविण्यात आल्या आहेत. छुपे कॅमेरेही दिले आहेत. तरीही कारवाई होत नाही, याकडे लक्ष वेधले असता, आपल्या कारकिर्दीत अशा कारवाया होतील, याची हमी डॉ. भोई यांनी दिली. सीटी स्कॅनसारख्या सुविधांसाठी केवळ तंत्रज्ञांच्या अभावामुळे खासगी रुग्णालयात जावे लागू नये, या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मेडिकल कॉलेजबाबत माहिती घेऊसाताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव अनेक वर्षे धूळ खात पडून आहे. कधी जमिनीच्या कारणावरून तर कधी सरकारी आदेशामुळे हा प्रस्ताव मागेच पडला आहे. तो मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार का, असे विचारले असता डॉ. भोई म्हणाले, ‘याबाबत अंतिम निर्णय मंत्रालय पातळीवरच होईल. परंतु सध्याची परिस्थिती काय आहे, याची माहिती घेऊन प्रस्ताव मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल.’‘एमडी’ मिळतच नाहीतमनुष्यबळाची कमतरता हाच रुग्णसेवा पुरविण्यातील महत्त्वाचा अडथळा असल्याचे सांगून डॉ. भोई म्हणाले, ‘एमडी मेडिसिन आणि एमडी रेडिओलॉजी या संवर्गातील उमेदवार मिळतच नाहीत, अशी स्थिती आहे. सांगलीत आम्हाला हाच अनुभव आला. जाहिराती देऊनसुद्धा ही पदे रिक्तच राहतात. यावर उपाय शोधण्याची गरज आहे.’