शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यात अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा

By admin | Updated: April 2, 2015 00:48 IST

सरपंच आरक्षण : १९५ ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर

कऱ्हाड : आॅगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या कऱ्हाड तालुक्यातील १९५ ग्रामपंचायतींतील सरपंच आरक्षण सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली. पाल, मसूर, उंब्रज, सैदापूर, कोपर्डे हवेली, रेठरे बुद्रुक आदी मोेठ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असून, सरपंच आरक्षण सोडतीकडे कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या होत्या.येथील यशवंतराव चव्हाण बचत भवनमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली. १९९५ पासून पडलेल्या आरक्षणाचा या सोडतीमध्ये विचार करण्यात आला. आॅगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण या सोडतीमध्ये निश्चित करण्यात आले. दुपारी बारा वाजल्यानंतर आरक्षण सोडतीस सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार सुधाकर भोसले, निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, नायब तहसीलदार मिनल भामरे-भोसले, पंचायत समिती गटविकास अधिकारी अविनाश फडतरे आदींसह राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या आरक्षण सोडतीमध्ये पडलेली आरक्षणे पुढीलप्रमाणे - सर्वसाधारण महिला - आरेवाडी, बनवडी, चिंंचणी, चोरे, धनकवडी, दुशेरे, घोणशी, गोळेश्वर, हजारमाची, हणबरवाडी, इंदोली, काले, कालवडे, खोडजाईवाडी, किवळ, कोळेवाडी, कोरेगाव, कोरीवळे, कुसूर, मालखेड, मस्करवाडी, नांदगाव, पाचुपतेवाडी, पश्चिम सुपने, सैदापूर, साकुर्डी, संजयनगर, शहापूर, शेणोली, शेवाळेवाडी (उंडाळे), तासवडे, तुळसण, वडोली निळेश्वर, वसंतगड, वस्ती साकुर्डी, वडोली भिकेश्वर, बाबरमाची, बेलवडे हवेली, चचेगाव, चरेगाव, चौगुलेमळा, धोंडेवाडी, गणेशवाडी, हेळगाव, हिंंगनोळे, जुजारवाडी, कालगाव, कासारशिरंबे, केसे, मनू, पाडळी, रेठरे बुद्रुक, सुर्ली, विठोबाचीवाडी, वडगाव हवेली. सर्वसाधारण प्रवर्ग- आदर्शगाव, अंधारवाडी, बानुगडेवाडी, डेळेवाडी, गमेवाडी, हरपळवाडी, हवेलवाडी, कालेटेक, करवडी, कवठे, कोयना वसाहत, मरळी, मेरवेवाडी, नडशी, ओंड, पाडळी केसे, पेरले, पार्ले, राजमाची, रिसवड, साजूर, साळशिरंबे, सयापूर, शेवाळेवाडी (म्हासोली), शिंंदेवाडी, तळबीड, उंडाळे, वाठार, विंंग, वाण्याचीवाडी, येळगाव, येणपे, येरवळे, येवती, अंबवडे, भवानवाडी, भोळेवाडी, घोगाव, खालकरवाडी, खराडे, किरपे, माळवाडी, मांगवाडी, म्होप्रे, निगडी, ओंडोशी, पाल, शिंंगणवाडी, शिरगाव, टेंभू, वडगाव उंब्रज, वनवासमाची (सदाशिवगड), वारुंजी, वाघेश्वर.अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षण पुढीलप्रमाणे - अनुसूचित जाती महिला आरक्षण- भोसलेवाडी, कापील, कार्वे, गोवारे, उंब्रज, वाघेरी, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, पिंंपरी, म्हासोली, कोणेगाव, उत्तर तांबवे, शामगाव, यादववाडी (उ.कोपर्डे), पाचुंद, नांदलापूर. अनुसूचित प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षण- भांबे, यशवंतनगर, विजयनगर, सवादे, अंतवडी, भुरभुशी, अकाईचीवाडी, सुपने, घारेवाडी, शिवडे, कांबिरवाडी, कोळे, येणके, गोसावेवाडी, रेठरे खुर्द, भुयाचीवाडी. अनुसूचित जमाती महिला आरक्षण- कोर्टी.नागरिकांचा मागास प्रवर्गातील आरक्षण पुढीलप्रमाणे - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण- कामथी, कचरेवाडी, गोंदी, पोतले, साबळेवाडी, गोटेवाडी, शिरवडे, जुळेवाडी, चिखली, नारायणवाडी, चोरजवाडी, खोडशी, शितळवाडी, जिंंती, तारुख, गोडवाडी, भरेवाडी, लटकेवाडी, जखिणवाडी, लोहारवाडी, बेलवडे बुद्रुक, म्हारुगडेवाडी, शेवाळेवाडी (म्हासोली), आणे, घोलपवाडी, बेलवाडी, वहागाव.नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षण - घराळवाडी, गोटे, मुनावळे, मसूर, हणमंतवाडी, कोडोली, अबईचीवाडी, वनवासमाची (खोडशी), बामणवाडी, विरवडे, वराडे, बेलदरे, हनुमानवाडी, पवारवाडी, शेरे, आटके, वानरवाडी, टाळगाव, शेळकेवाडी (येवती), तांबवे, धावरवाडी, मुंढे, नवीन कवठे, गायकवाडवाडी, खुबी, यादववाडी. (प्रतिनिधी)