शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पे अ‍ॅण्ड पार्क’ सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:40 IST

उंब्रज : येथील बसस्थानकावर ‘पे अँड पार्क’ची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. उंब्रज हे महामार्गावरील गाव असून, ...

उंब्रज : येथील बसस्थानकावर ‘पे अँड पार्क’ची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. उंब्रज हे महामार्गावरील गाव असून, परिसरातील विविध भागांतील नागरिक येथे खरेदी, शिक्षण, नोकरी व्यवसायासाठी येतात तसेच अनेकजण येथे येऊन पुढे नोकरीच्या गावाला जातात. मात्र, कुठेही सुरक्षित वाहन ठेवण्याची व्यवस्था नाही. रस्त्याकडेला वाहन उभे करताच पोलीस कारवाई करतात. येथील बसस्थानकाला मोठी जागा आहे तेथे कोठेही ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ची व्यवस्था करता येईल. त्यादृष्टीने बसस्थानक व्यवस्थापनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे.

बाटल्यांमुळे डोकेदुखी

कऱ्हाड : शहरातील कोल्हापूर नाक्यावरील गटारात प्लास्टिकसह काचेच्या बाटल्यांचा खच पडला आहे. कऱ्हाड व मलकापूर पालिकेच्यादृष्टीने ही डोकेदुखी ठरत आहे. सातत्याने गटारांची स्वच्छता करूनही मद्यपींकडून रिकाम्या बाटल्या गटारात टाकल्या जात आहेत. त्यामुळे गटर तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. रिकाम्या बाटल्या गटारमध्ये टाकल्यामुळे पाईप तुंबून पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे या प्रकाराबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मलकापुरात उड्डाणपुलाखाली अतिक्रमण

मलकापूर : येथील कृष्णा रुग्णालयासमोर असलेल्या महामार्ग पुलाखाली चारचाकी वाहनचालक आपली वाहने दिवसभर उभी करत आहे. त्यामुळे पुलाखाली वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळेस या ठिकाणी कोंडी होत असून पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. अनेक वाहनधारक पुलाखाली वाहन उभे करून निघून जातात. दिवसभर ते तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे कोंडी झाल्यास वाहने हटवायची कशी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे.

तळमावले विभागात रानडुकरांचा उपद्रव

तळमावले : कुंभारगाव विभागात रानडुकरांकडून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. विभागातील बहुतांश शेती बागायत आहे. पाण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे अनेक शेतकरी माळव्याची पिके घेतात. मात्र, रानडुक्करांकडून नुकसान होत असल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. वनविभागाने या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

रस्त्याची दुरावस्था

कोपर्डे हवेली : शहापूर ते अंतवडीला जाणारा अंतर्गत रस्ता खड्ड्यात आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्यामुळे चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. मसूर ते पुसेसावळी मार्गाला पर्यायी रस्ता म्हणून हा रस्ता वापरला जातो. या रस्त्यावरून दुचाकीसह इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.