शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटवा अन्यथा ५०० टपऱ्यांसाठी परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

सातारा : सातारा शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. बेकायदा टपऱ्या टाकून अनधिकृतपणे व्यवसाय केला जातो. त्या तातडीने हटवाव्यात ...

सातारा : सातारा शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. बेकायदा टपऱ्या टाकून अनधिकृतपणे व्यवसाय केला जातो. त्या तातडीने हटवाव्यात अन्यथा शिवसेनाला ५०० टपऱ्या टाकण्याच्या परवानगी द्या, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साताऱ्यातील राजवाडा, मोती चौक, ५०० एक पाटी चौक, बसस्थानक, नगरपालिका, कोविड हॉस्पिटल परिसर, आरटीओ ऑफिस, जिल्हा परिषद, राजपथ, खणआळी, जिल्हा रुग्णालय, राधिका रोड, हुतात्मा चौक आदी ठिकाणी टपऱ्यांचे अतिक्रमण वाढले आहे. मोती चौक ते पाचशे एक पाटी या रस्त्यावर काही दुकानदार स्वत:चे दुकान असतानाही रस्त्यावर माल लावतात. दुचाकी लावायलाही जागा नसते. काही दुकानदार दुकानांसमोर बेकायदेशीरपणे हातगाडी लावून संबंधित व्यक्तींकडून महिन्याला हजारो रुपये आकारात आहेत. अनेक फळे, कपडे, स्टेशनरी, सौंदर्य प्रसादने, खाद्यपदार्थ विक्रेते रस्त्यावर अडथळे होईल, अशा पद्धतीने विक्री करतात. सदाशिव पेठेतील खणआळीतील अनेक दुकानदारांनी रस्त्यावर माल लावून वाहतुकीस अडथळा केला आहे. संबंधित अडथळे १५ दिवसांत हटवावेत, तसेच नोंदणीकृत टपऱ्याधारकांना योग्य तेथे जागा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शिवसेनेला पाचशे टपऱ्या अधिकृतपणे टाकण्यास परवानगी द्यावी.

निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, पोलीस अधीक्षक, शहर पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.