शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

दंडाच्या रूपात वाहनचालकांवर चक्क तीन कोटींचं ‘कर्ज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोलिसांकडे असलेली ई-चलन मशीन चालती फिरती बँक बनली असून, या मशीनमधून वर्षभरात तब्बल ३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पोलिसांकडे असलेली ई-चलन मशीन चालती फिरती बँक बनली असून, या मशीनमधून वर्षभरात तब्बल ३ कोटी ३ लाख ४ हजार ५०० रुपयांचा दंड वाहन चालकांना करण्यात आलाय. मात्र, हा दंड वाहन चालकांनी अद्याप भरला नसून, दंडाच्या स्वरूपात दिलेले हे ‘कर्ज’ वाहन चालकांना एक ना एक दिवस फेडावेच लागणार आहे.

पोलिसांच्या हातात पूर्वी पावती पुस्तक असायचं. या पुस्तकावरच पोलिसांचा महसूल ठरलेला असायचा. वाहन चालकांना दंडाची रक्कम भरल्यानंतर पावती दिली जात होती. या पावतीचा धसका अनेकांना असायचा. मात्र, काळाच्या ओघात पोलिसांच्या हातात पावती पुस्तकाऐवजी ई-चलन मशीन आलं. मशीन नवी, तसे या मशीनचे नियमही नवेच. वाहन चालकाने दंडाची पावती जागेवरच न भरण्याची सूट म्हणे या मशीनने दिली. पर्याय म्हणून या मशीनने वाहन चालकांच्या मोबाईलवर दंडाची रक्कम पाठविण्याची मुभा दिली. ही मुभाच आता पोलिसांची डोकेदुखी ठरू लागलीय. अनेक वाहन चालक दंड केल्यानंतर जागच्या जागी दंड भरत नाहीत. बघू, पुन्हा कधी तरी भरू, असे म्हणून वेळ मारून नेतायेत. त्यामुळे अनपेड दंडाच्या रकमेचा फुगा दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेषत: सर्वाधिक कारवाया या महामार्गावर झालेल्या आहेत. एकट्या भुईंज टॅप पोलिसांकडे असलेली दंडाची आकडेवारी बरेच काय सांगून जातेय. विविध प्रकारचा दंड न भरलेल्या वाहनांवर पोलिसांनी २ कोटी ९१ लाख ७२ हजारांचा दंड केला आहे, तर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर तब्बल ११ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड केलाय. या दोन्ही कारवायांतून ३ कोटी ३ लाख ४ हजार ५०० रुपयांची थकबाकी दिसून येत आहे. म्हणजे दंडाच्या रूपात का होईना, पोलिसांनी वाहन चालकांना ‘कर्ज’ दिले आहे. आता हे कर्ज वसूल करण्याच्या वेगळ्याच पद्धती समोर आल्या आहेत. यदाकदाचित पुन्हा तेच वाहन पोलिसांच्या कचाट्यात सापडले, तर मागचा दंड भरल्याशिवाय गाडी सोडायची नाही, असा म्हणे नियम आहे. त्यामुळे ही थकीत रक्कम पूर्णपणे वसूल होण्यास किती वर्षांचा अवधी लागेल, हे पोलीसही सांगू शकत नाहीत.