शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

दादाराजेंचीही जबाबदारी रामराजेंवरच!

By admin | Updated: April 30, 2015 00:26 IST

जिल्हा बॅँक निवडणूक : राष्ट्रवादीत महाभारताचे युद्ध --सांगा डीसीसी कोणाची ?

नसीर शिकलगार - फलटण -सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकपदासाठी यावेळी फलटण तालुक्यातून तीन उमेदवार उभे आहेत. एकंदरीत या लढतीचा विचार करता दोन उमेदवार सहज निवडून येणार आहेत. मागील वेळेस तीन संचालक होते. मात्र, या वेळेस दोन संचालक असणार आहेत.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बॅँकेत गेल्या निवडणुकीत फलटण तालुक्यातून रामराजे नाईक-निंबाळकर, दादाराजे खर्डेकर, विश्वासराव निंबाळकर हे राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेमधून निवडून आले होते. तर यशवंतराव रणवे पराभूत झाले होते. निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने सोसायटी मतदारसंघातून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना तर कृषिप्रक्रिया मतदारसंघातून दादाराजे खर्डेकर यांना उमेदवारी दिली आहे.रामराजेंच्या विरोधात फलटण तालुका राष्ट्रीय कॉँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी शड्डू ठोकला आहे. फलटण तालुक्यावर रामराजेंचे एकहाती वर्चस्व आहे. बऱ्याच सोसायट्या त्यांच्या ताब्यात असून, या मतदारसंघातून त्यांना मोठा एकतर्फी विजय मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. सोसायटी मतदारसंघात रामराजेंचे पारडे जड आहे. या मतदारसंघात एकूण १२८ मतदार आहेत.रामराजेंनी आग्रहाने कृषिप्रकिया मतदारसंघातून निकटचे सहकारी दादाराजे खर्डेकर यांना पुन्हा उमेदवारी मागून घेतली आहे. त्यांच्याविरोधात कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील उभे आहेत. या मतदारसंघात फक्त ३० मतदार असून, त्यात सातारामध्ये नऊ, फलटणमध्ये आठ, कऱ्हाड चार, वाई दोन, कोरेगाव दोन तर पाटण, जावळी, महाबळेश्वर, खटाव आणि खंडाळ्यात प्रत्येकी एक असे मतदार आहेत. सातारा व फलटणच्या मतदारांच्या जोेरावर दादाराजे खर्डेकर विजयी होऊ शकतात, असे चित्र आहे. प्रचारासह वैयक्तिक भेटीगाठींवर जोरजिल्हा बॅँकेसाठी रामराजेंनी सभासदांचा मेळावा घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. तसेच ते वैयक्तिक संपर्कही साधत आहेत. दुसरीकडे त्यांचे विरोधक तुकाराम शिंदे यांनी व्यक्तिगत गाठी-भेटी घेत प्रचार सुरू ठेवला आहे. रामराजेंनी ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. तर दादाराजे खर्डेकर यांची मदार रामराजे व शिवेंद्रसिंहराजेंवर असल्याने त्यांच्या माध्यमातून दादाराजे खर्डेकरांचा प्रचार सुरू आहे.