मारहाणप्रकरणी सहाजणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:42 IST2021-09-18T04:42:20+5:302021-09-18T04:42:20+5:30

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीत एका घरासमोरील अंगणात पत्रा लावण्याच्या कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर ...

Crime against six persons in assault case | मारहाणप्रकरणी सहाजणांवर गुन्हा

मारहाणप्रकरणी सहाजणांवर गुन्हा

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीत एका घरासमोरील अंगणात पत्रा लावण्याच्या कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी किरण प्रभाकर मुळे (रा. औद्योगिक वसाहत, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार औद्योगिक वसाहतीत मुळे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बाहेरील बाजूस पत्रा लावण्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये दांडके, फरशीचा वापर करण्यात आला; तर तक्रारीनंतर जितेंद्र तिकुडे (पूर्ण नाव नाही), त्यांचा मुलगा, सून, पत्नी, सासू व मित्र सचिन खिलारे अशा सहाजणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कोकरे तपास करीत आहेत.

........................................................

Web Title: Crime against six persons in assault case