कवठे : चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीन मुलांना पोलीस ठाण्यात घुसून मारहाण केल्याप्रकरणी ओझर्डेच्या माजी सरपंच सुवर्णा कुंभार यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ओझर्डे येथील दोन अल्पवयीन मुलांनी एका मुलीच्या मोबाईल सोमवारी संभाषण केले होते. यानंतर मुलीच्या वडिलांनी संबंधित मुलांच्या विरोधात भुर्इंज पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी सुरू असताना मुलीच्या आई-वडिलांसह २५ ते ३० लोकांचा जमाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. यानंतर माजी सरपंच सुवर्णा कुंभार, शशिकांत कुंभार, रवींद्र धोंडिबा कुंभार, संतोष कुंभार, महेश कुंभार, सारिका कुंभार यांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना मारहाण केली. याप्रकरणी ओझर्डेच्या माजी सरपंच सुवर्णा कुंभार, शशिकांत कुंभार, यांच्यासह इतर चारजणांवर तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहे. (वार्ताहर)
माजी महिला सरपंचावर गुन्हा
By admin | Updated: August 22, 2014 22:05 IST
ओझर्डे : पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचे प्रकरण अंगलट
माजी महिला सरपंचावर गुन्हा
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}