शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लसीकरणाने सर्वसामान्यांना दिलासा : मकरंद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:34 IST

खंडाळा : कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण देशाला विळखा घातला होता. सर्वसामान्य जनतेला यापासून दूर ठेवण्यासाठी आणि बाधित लोकांना सेवा ...

खंडाळा : कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण देशाला विळखा घातला होता. सर्वसामान्य जनतेला यापासून दूर ठेवण्यासाठी आणि बाधित लोकांना सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाने दिवसरात्र मेहनत घेतली आहे. हे आरोग्य कर्मचारी खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीकरणामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, उपसभापती वंदना धायगुडे, सदस्या शोभा जाधव, तहसीलदार दशरथ काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र कोरडे यांसह प्रमुख उपस्थित होते.

खंडाळा तालुक्यात ८९१ जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. प्रतिदिन १०० लोकांना ही लस टोचली जाणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले असून, ही मोहीम सलग नऊ दिवस सुरू राहणार आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांचे विशेष प्रशिक्षण झाले आहे.

१७खंडाळा

फोटो : खंडाळा येथे कोविड लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करताना आमदार मकरंद पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.