दहिगाव सोसायटीत १ कोटी २५ लाखांचा भ्रष्टाचार

By Admin | Updated: July 17, 2014 23:17 IST2014-07-17T23:11:24+5:302014-07-17T23:17:19+5:30

देऊर पाठोपाठ दहिगाव सोसायटी अडचणीत

Corruption of Rs.1.55 crore in Dahigaa Society | दहिगाव सोसायटीत १ कोटी २५ लाखांचा भ्रष्टाचार

दहिगाव सोसायटीत १ कोटी २५ लाखांचा भ्रष्टाचार

वाठार स्टेशन : कोरगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर सोसायटीत दोन कोटींची अफरातफर झाल्याची घटना ताजी असतानाच आता याच सचिवाकडे असलेल्या दहिगाव विकास सोसायटीतही जवळपास १ कोटी २५ लाखांची अफरातफर झाल्याचे उघडकीस आल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
‘नाबार्ड’चे सलग पुरस्कार घेऊन आदर्शवादाचा डंका पिटणाऱ्या जिल्हा बँकेच्या अधिपत्याखाली चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात १० सोसायट्यांत भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या.
देऊर सोसायटी व दहिगाव सोसायटी या दोन्ही सोसायट्या एकाच सचिवाच्या अधिपत्याखाली होत्या. देऊरमधील भ्रष्टाचार जाहीर होताच दहिगावमध्येही सुरुवातीला कुजबूज झाली. आता या सोसायटीच्या लेखापरीक्षण अहवालात ६५ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. यात एकूण १ कोटी २५ लाखांचा भ्रष्टाचार सचिवाने केल्याचा आरोप ठेवला आहे. यात संचालक मंडळ, जिल्हा बँक विकास अधिकारी, सचिव यांच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)
सभासद शेतकऱ्यांची फसवणूक करून सचिवाने खोट्या सह्या करून बँक विकास अधिकारी यांना हाताला धरून आमच्या नावे दुबार कर्जप्रकरणे केली जात आहेत. यामधील जबाबदार असणाऱ्या लेखापरीक्षकांसह जिल्हा बँक विकास अधिकारी संचालक मंडळाबबात योग्य ती कारवाई आवश्यक आहे.
- सतीश चव्हाण,सभासद, दहिगाव सोसायटी

Web Title: Corruption of Rs.1.55 crore in Dahigaa Society