corona virus :जिल्ह्यात आणखी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:48 IST2020-10-17T18:47:41+5:302020-10-17T18:48:41+5:30

सातारा जिल्ह्यात कोरोना बळींचे मृत्यूसत्र सुरूच असून, शनिवारी आणखी ७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ४२२ झाली आहे.

corona virus: 7 more die of corona in the district | corona virus :जिल्ह्यात आणखी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

corona virus :जिल्ह्यात आणखी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू६४ जणांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा : जिल्ह्यात कोरोना बळींचे मृत्यूसत्र सुरूच असून, शनिवारी आणखी ७ जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार ४२२ झाली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी रात्री २६४ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दुर्गा पेठ, सातारा येथील ६७ वर्षीय महिला, कुसुंबी, (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, खटाव येथील ६२ वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील ९० वर्षीय पुरुष तसेच पाटखळ, (ता. सातारा) येथील ७८ वर्षीय पुरुष, व्याजवाडी, (ता. वाई) येथील ७५ वर्षीय पुरुष, म्हसवड, (ता. माण) येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा वेग चांगला असल्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळत आहे. आतापर्यंत ३५ हजार ६९९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच ४३ हजार २३३ बाधितांची संख्या झाली आहे.

Web Title: corona virus: 7 more die of corona in the district