शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गणरायासमोर साप खेळवणारे ताब्यात

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

कऱ्हाडात कारवाई : दहा विषारी, बिनविषारी सर्प जप्त; ‘सोशल मीडिया’मुळे प्रकार उघड

कऱ्हाड : गणपतीच्या स्टेजवर जिवंत सापांचा खेळ करणाऱ्या सर्पमित्रांच्या टोळीचा व्हिडीओ व छायाचित्रे ‘सोशल साईट’वरून व्हायरल झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या वनविभागाने या सर्पमित्रांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. याप्रकरणी सोमवारी दुपारी वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले असून, अन्य काहीजणांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या सर्पमित्रांकडून वनविभागाने नाग, घोणस यासारखे विषारी व काही बिनविषारी असे एकूण दहा साप जप्त केले आहेत. संबंधित साप  तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत याबाबतची कारवाई सुरू होती. कऱ्हाडातील एका गणेश मंडळाच्या स्टेजवर रविवारी रात्री एक देखावा सादर करण्यात आला होता. या देखाव्यात काहीजण जिवंत  साप हातामध्ये घेऊन त्यांचा खेळ सुरू होते. नागाच्या फण्याचे चुंबन घेणे, स्टेजवर ठेवलेल्या सापाच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या फण्यावर ओठ टेकवणे, साप प्रतिसाद देत नसेल तर त्याच्या फणावर कागदी पुठ्ठ्याने मारणे असे प्रकार त्या देखाव्यात झाले होते. काही  दर्शकांनी हौसेखातर या देखाव्याचे चित्रीकरण केले. तसेच काहींनी मोबाईलमध्ये छायाचित्रेही घेतली. रविवारी रात्रीपासून हे व्हिडीओ व छायाचित्रे सोशल मीडियावरून सर्वत्र पसरली.वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्हिडीओ व छायाचित्रे वन्यजीव विभागाच्या दिल्लीतील कार्यालयापर्यंत पोहोचली. तेथील अधिकाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी प्राथमिक माहिती मिळविली. त्यावेळी व्हिडीओ व छायाचित्रे कऱ्हाडातील असल्याचे समोर आले. सोमवारी सकाळी याबाबत कऱ्हाडच्या वनविभागाला माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेण्यास सुरूवात केली.संबंधित व्हिडीओ व छायाचित्रे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळविली. त्यामध्ये सर्पांशी खेळताना दिसणाऱ्या युवकांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये त्यांना तीन विषारी नागांसह घोणस, धामण व अन्य काही जातींचे एकंदर दहा साप आढळले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत दोघांना ताब्यात घेतले होते. अन्य काही जणांनाही यामध्ये अटक होण्याची शक्यता असून त्याबाबतचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)साप बाळगणे हा गुन्हाच !सर्पमित्र म्हणून वावरत असताना एखाद्या ठिकाणी साप आढळून आला तर तो पकडून तातडीने सुरक्षित ठिकाणी सोडून देणे योग्य आहे. मात्र, साप स्वत:जवळ बाळगून ठेवणे हा गुन्हाच असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.