मलकापूर शहरात निर्बंधांबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST2021-04-07T04:40:59+5:302021-04-07T04:40:59+5:30

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती विचारात घेऊन आवश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंदचा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यानुसार मलकापूर ...

Confusion over restrictions in Malkapur city | मलकापूर शहरात निर्बंधांबाबत संभ्रम

मलकापूर शहरात निर्बंधांबाबत संभ्रम

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती विचारात घेऊन आवश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंदचा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यानुसार मलकापूर शहरातील काही व्यावसायिकांनी सकाळपासूनच अर्ध्यावर शटर ठेऊन बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र होते. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काही व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. काही व्यावसायिकांनी मात्र निर्बंध झुगारून व्यवसाय सुरूच ठेवल्याचेही दिसून आले. महामार्गासह प्रमुख राज्य मार्गांवर काही प्रमाणात वाहतूक सुरू होती. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यालगत व जखीणवाडी रस्त्यावर अनेक ठिकाणी कोरोनाची भीती न बाळगता भाजी विक्रेत्यांनी मंडई थाटली होती, तर खरेदीदारही घोळका करून खरेदी करीत होते.

फोटो : ०६केआरडी०५

कॅप्शन : मलकापुरात मंगळवारी निर्बंधांबाबत संभ्रम असल्यामुळे काही व्यवसाय सुरू, तर काही बंद दिसून येत होते. (छाया : माणिक डोंगरे)

Web Title: Confusion over restrictions in Malkapur city