शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यात ढगाळ वातावरण; पालेभाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

ढगाळ वातावरणामुळे पाले भाज्यांच्या पिकांवर किडीचा प्रादूर्भाव रानं तयार पण पावसाचाच पत्ता नाही लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : ...

ढगाळ वातावरणामुळे पाले भाज्यांच्या पिकांवर किडीचा प्रादूर्भाव

रानं तयार पण पावसाचाच पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : कऱ्हाड तालुक्यात शेतकऱ्याने पेरणीसाठी मशागत करून राने तयार केली असली तरी अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असल्यामुळे पालेभाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी मे महिन्यापूर्वीच शेतातील मशागतीची कामे पूर्ण करतात. अशाच पद्धतीने या वर्षीही मशागतीची कामे लवकर आटोपून शेतकरी पेरणीसाठी तयार झाले होते. त्यातच तालुक्यात पुणे-बंगळूर महामार्गामुळे शेतीची दोन भागांत विभागणी होते. महामार्गाच्या पूर्वेकडील भागात बागायती शेती करण्याची पध्दत वेगळी आहे, तर पश्चिमेकडील भागात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे या भागातील शेती करण्याची पद्धत वेगळी आहे. पश्चिमेकडील भागात परंपरागत शेती पद्धतीनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धात धूळवाफेवरच पेरण्या करण्याची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा विचारात घेता पारंपरिक पद्धतीने शेती करणे अवघड झाले आहे. असे असतानाही आजही काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवरच पेरणी करतात. अशा पद्धतीने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते. बहुतांशी शेतकरी समाधानकारक पाऊस झाल्यावरच पेरणी करतात.

पूर्वेकडील भागात बागायती शेती असल्यामुळे सरी सोडून टोकणी पध्दतीने शेती करण्याची परंपरा आहे. बागायती शेतीत शेतकरी अंतर्गत पिके टोकण पद्धतीने करतात. ऊस लागणही शेताला पाणी पाजून केली जाते. मात्र, अंतर्गत पीक टोकणी ही पावसाच्या ओलीवरच करण्यात येते. त्यानुसार शेतकऱ्यांची मशागतीची कामे मे महिन्यातच पूर्ण झाली आहेत. मात्र, पावसाळा सुरू होऊन १० दिवस उलटले तरी पावसाने दडी मारली असल्यामुळे पूर्वेकडील भागात सरी सोडून शेतकरी टोकणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत आहे. तर पश्चिमेकडील धूळवाफेवर पेरणी केलेले शेतकरी अडचणीत आले आहेत.

तालुक्यातील मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले ही वेलवर्गीय भाज्याही घेतल्या जातात. भेंडी, गवारी, घेवडा यासारख्या शेंगवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही सध्या या परिसरात वाढली आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पालेभाज्यांवर किडीचा प्रादर्भाव वाढला आहे.