शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

औंध : खटाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सततचे ढगाळ ...

औंध : खटाव तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सततचे ढगाळ आणि पावसाचे वातावरण झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यावर्षीचे हाता-तोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा दिला, तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मात्र, शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटविला. यामुळे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. यावर्षी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळले आहेत. त्याचबरोबर गहू, ज्वारी, हरभरा या पिकांनाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. मात्र, सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने गव्हावर तांबेरा आला आहे. यासोबतच काही भागामध्ये गव्हावर अळीचाही प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळाले.

या प्रतिकूल हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्यालाही करप्याने वेढले आहे. त्यामुळे कांद्याची नवीन लागवड धोक्यात आली आहे.

चौकट...

शेतकऱ्यांकडून विविध औषधांच्या फवारण्या..

या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांच्या फवारण्या सुरू केल्या आहेत. शेतकरी महागडी औषधे फवारणी करताना दिसून येत आहेत. परंतु हवामान सुधारले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. यावर्षी शेवटी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले. परिणामी यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावर देखील पाणी फिरते की काय? या धास्तीने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग आले आहेत.

०७औंध

फोटो :

औंधसह परिसरात ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडू लागला आहे. (छाया-रशीद शेख)