रस्त्याच्या साईट पट्ट्यांवरील स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:51 IST2021-02-27T04:51:09+5:302021-02-27T04:51:09+5:30

कऱ्हाड ढेबेवाडी मार्गावरील कुसूर ते वानरवाडी या सहा किलोमीटर अंतर असलेल्या जोड रस्त्याशेजारील साईट पट्ट्या व शेजारी मोठे गवत ...

Cleaning of roadside strips | रस्त्याच्या साईट पट्ट्यांवरील स्वच्छता

रस्त्याच्या साईट पट्ट्यांवरील स्वच्छता

कऱ्हाड ढेबेवाडी मार्गावरील कुसूर ते वानरवाडी या सहा किलोमीटर अंतर असलेल्या जोड रस्त्याशेजारील साईट पट्ट्या व शेजारी मोठे गवत वाढल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता. डोंगर पायथ्याला लागून हा रस्ता जात असल्याने अनेक धोकादायक वळणे आहेत. परिणामी या वळणावर मोठी झुडपे वाढल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अनेक लहान मोठ्या वाहनांना अपघात होत होते . यावेळी झुडपे काढण्याची मागणी संबंधित विभागाकडे करण्यात आली होती.

झुडपे काढल्यामुळे व रस्त्याशेजारील नाली उजरल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे . तारूख-वानरवाडी हा जोड रस्ताही या मार्गाला जोडला असल्याने वाहनांचा सतत राबता असतो. रस्ता मोकळा झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे .

Web Title: Cleaning of roadside strips