शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

चिमणगावचा जरंडेश्‍वर शुगर मिल्स गळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : ईडीच्या कारवाईमुळे यावर्षी चिमणगाव येथील जरंडेश्‍वर शुगर मिल्स हा साखर कारखाना सुरू राहणार की ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव : ईडीच्या कारवाईमुळे यावर्षी चिमणगाव येथील जरंडेश्‍वर शुगर मिल्स हा साखर कारखाना सुरू राहणार की नाही या प्रश्‍नावर आता पडदा पडला आहे. कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगामाची पूर्ण तयारी केली असून, शनिवारी रोलर पूजनाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने करण्यात आला.

माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांच्या तक्रारींच्या सपाट्यानंतर ईडीने जरंडेश्‍वर कारखाना जप्त केला होता. त्यानंतर सर्वपक्षीय नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कारखाना सुरू रहावा, यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. कारखाना सुरू राहणार की बंद राहणार याविषयी साशंकता होती, मात्र कारखाना व्यवस्थापनाने कारखाना सुरू ठेवण्याच्यादृष्टीने सर्वतोपरी तयारी केली होती.

कारखान्याचा यावर्षीचा गळीत निर्विघ्नपणे पार पडणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. शनिवार, दि. ३१ जुलै रोजी सकाळी संचालक विजय जगदाळे यांच्या हस्ते विधीवत रोलर पूजन करण्यात आले. यावर्षी २० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सातारा जिल्ह्यातच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रात जरंडेश्‍वर शुगर मिल्सने गाळप, रिकव्हरी आणि दरामध्ये नेहमीच अव्वल स्थान राखले आहे. कोरेगाव-खटाव तालुक्यासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त उसाचे गाळप यावेळी केले जाणार आहे, असे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

फोटो : ३१जरंडेश्वर

जरंडेश्वर साखर कारखान्याचे रोलर पूजन शनिवारी करण्यात आले.