शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
2
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
3
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
4
विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
7
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
10
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
11
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
12
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
13
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
14
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
15
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
16
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
17
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
18
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
19
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
20
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्ल्स’वर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

By admin | Updated: November 25, 2014 23:47 IST

सातारा जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांचे जवळपास सातशे ते आठशे कोटी रुपये अडकून

सातारा : ठेवीदारांच्या रकमा वेळेवर परत मिळत नसल्यामुळे ‘पीएसील’ तथा ‘पर्ल्स’ कंपनीवर ‘एमपीआयडी अ‍ॅक्ट १९९९’ अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ठेवीदारांनी या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांची कऱ्हाडमध्ये भेट घेतली आणि आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान, यावेळी राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटीलही यावेळी उपस्थित होते.अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, ठेवीदार प्रतिनिधी चंद्रकांत घाडगे, तात्या उर्फ उत्तम सावंत आणि शंभरहून अधिक ठेवीदारांनी मंगळगवारी कऱ्हाड येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पर्ल्स कपंनीत रक्कम गुंतवलेल्या ठेवीदारांना मुदत संपल्यानंतरही रक्कम परत मिळालेली नाही.
या कंपनीत सातारा जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांचे जवळपास सातशे ते आठशे कोटी रुपये अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील लाखो ठेवीदारांचे जवळपास ८ हजार कोटी अडकून पडले आहेत. दरम्यान, ठेवीदारांच्यावतीने बाजू मांडताना जगताप म्हणाले, ‘पर्ल्स कंपनीवर महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरेस्ट आॅफ डिपॉझिटर्स (इन फायनान्सिएल इस्टॅब्लिशमेंट) अ‍ॅक्ट १९९९’ नुसार कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. ‘एमपीआयडी अ‍ॅक्ट’च्या कलम ४ चे ३ तरतुदीनुसार जिल्हाधिकारी प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या तक्रारी ऐकून कारवाई करता येऊ शकते. त्याचबरोबर पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तरतूद असून असे झाले तर शासन कॉम्पिन्ट अ‍ॅथॉरिटी नेमून कंपनी आणि संचालकांच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करू शकणार आहे.
परिणामी गुंतवणूकदारांच्या रकमा सुरक्षित होणार आहेत. ही माहिती ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पर्ल्स’वर होणार ‘एमपीआयडी’ अंतर्गत कारवाई करण्याबाबत अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू आणि प्रत्यक्षात त्या अनुषंगाने कार्यवाही करू असे आश्वासन ठेवीदार आणि अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासला दिले. (प्रतिनिधी)