शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चाफळ विभागाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST

चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याची संक्रमण साखळी खंडित केली. यासाठी जिल्हा प्रशासनाने ...

चाफळ : पाटण तालुक्यातील चाफळ विभागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्याची संक्रमण साखळी खंडित केली. यासाठी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले. विशेष म्हणजे या चाफळ आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका भारती हांडे या काळात कोरोना बाधित निघाल्या. कोरोनावर मात केल्यानंतर लगेचच रूजू होत गावोगावचे लसीकरण पूर्ण केले.

कोरोनाने दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना राबवत सर्वत्र कडक लाॅकडाऊन सुरू केले आहे. चाफळ विभागातही याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस व महसूल विभागाच्या खांद्याला खांदा देत येथील आरोग्य विभागही जिवाची बाजी लावताना दिसत आहे. संपूर्ण डोंगर दऱ्याखोऱ्यात विखुरलेल्या चाफळ विभागात २२ गावे व २३ वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. विभागातील बहुतांश गावे ही डोंगर कपारीत वसलेली आहेत. यातील १९ गावांत दुसऱ्या लाटेत कोरोनाने शिरकाव करत १४० जण बाधित आढळले होते.

या कठीण परिस्थितीत कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा कार्यरत होती. वाडीवस्तीवरील घरोघरी जाऊन विविध उपाययोजना राबवत जनसामान्यांत जनजागृती केली आहे. गावागावातील प्रत्येक नागरिकाला लसीकरणाचा पहिला डोस कसा देता येईल, याचे योग्य नियोजन करत पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण केले आहे.

सध्या गावोगावी उभारलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी करत ग्रामस्तरीय दक्षता समितीसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. विलगीकरण कक्षातील कोरोना बाधितांवर वेळोवेळी औषधोपचार करत गावोगावी राबवलेल्या इतर उपाययोजनांमुळे चाफळ विभागात कोरोनाची संक्रमण साखळी खंडित झाली आहे. आज संपूर्ण चाफळ विभाग कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्याची मागणी चाफळ विभागातील ग्रामस्थांनी केली आहे.