शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:27 IST

आरोपींनी चक्रवाढ व्याजाचा तगादा लावून त्यांना आर्थिक व मानसिक छळ केला

म्हसवड : माण तालुक्यातील जांभुळणी येथील वीरकर वस्ती येथील शेतकरी बाळकृष्ण ज्ञानदेव जानकर (वय ५५) यांनी खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून मानसिक त्रासातून आत्महत्या केली होती. याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.जांभुळणी, ता. माण, वीरकर वस्ती येथील शेतकरी बाळकृष्ण ज्ञानदेव जानकर यांनी तीन वर्षांपूर्वी आरोपी अशोक बाबा कोकरे, प्रवीण अशोक कोकरे आणि दीपक अशोक कोकरे (सर्व रा. जांभुळणी, ता. माण, जि. सातारा) यांच्याकडून दहा हजार इतकी रक्कम घेतली होती. ती रक्कम दहा टक्के व्याजासह परत केल्यानंतरही आरोपींनी चक्रवाढ व्याजाचा तगादा लावून त्यांना आर्थिक व मानसिक छळ दिला.याचदरम्यान आरोपींनी व्याजाच्या मोबदल्यात जानकर यांच्या नावावर असलेली २४ गुंठे शेतजमीन दस्तऐवज करून घेतली. उर्वरित रक्कम न देता शेतकऱ्याला त्रास देत राहिले. या त्रासामुळे बाळकृष्ण जानकर यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केली आहे.या घटनेची म्हसवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे तपास करीत होते. चौकशीत तिघा आरोपींचा त्रास आणि सावकारी व्यवहार स्पष्ट झाल्याने म्हसवड पोलिस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Three Booked for Abetting Farmer's Suicide in Satara District

Web Summary : Satara farmer Balakrishna Jankari committed suicide due to harassment by private lenders. Ashok Kokare, Praveen Kokare, and Deepak Kokare are booked for usury and abetment after allegedly seizing land and demanding exorbitant interest, driving Jankari to suicide. Police investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसFarmerशेतकरी