मोरेवाडीत वाहकाला मारहाण; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:54 IST2021-02-26T04:54:53+5:302021-02-26T04:54:53+5:30

सातारा : बसथांब्यावर उभ्या असलेल्या एसटीमध्ये पाणी का टाकले, असे विचारल्याच्या कारणावरून वाहकाला दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना ...

Carrier beaten in Morewadi; Both arrested | मोरेवाडीत वाहकाला मारहाण; दोघांना अटक

मोरेवाडीत वाहकाला मारहाण; दोघांना अटक

सातारा : बसथांब्यावर उभ्या असलेल्या एसटीमध्ये पाणी का टाकले, असे विचारल्याच्या कारणावरून वाहकाला दोघांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

केतन नामदेव मोकाशी (वय २२), सुमित प्रकाश मोरे (वय २३, दोघेही रा. मोरेवाडी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रवाशांना उतरण्यासाठी बस थांबल्यानंतर एकाने पाणी एसटीमध्ये फेकले. वाहक रणजित कुंभार (वय २८) यांच्या अंगावर पाणी पडल्याने ते संपूर्ण भिजले. त्यामुळे त्यांनी याचा जाब विचारला असता संबंधितांनी आता आमच्या गावात तू आहेस असं म्हणत डोक्यात बादली मारली. यात कुंभार हे जखमी झाले. या प्रकारानंतर कुंभार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी काही तासातच केतन आणि सुमित या दोघांन अटक केली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Carrier beaten in Morewadi; Both arrested