शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

साठ्याच्या दुप्पट पाणी वाटपाचा हिशोब!

By admin | Updated: September 15, 2014 23:24 IST

अधिकाऱ्याचा जावईशोध : साठवण क्षमता ५.८५ टीएमसी

एकनाथ माळी - तारळे  -तारळी धरणातील पाणीसाठा व त्याचा होणारा वापर याबाबत अधिकारीच अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ५.८५ टीएमसी असताना चक्क १० टीएमसी पाणी वाटप होणार असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे़ याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो, एवढेच उत्तर त्यांच्याकडून दिले जात आहे़ मुरूड येथे सुमारे ५़८५ टीएमसी पाणीसाठ्याचे धरण बांधण्यात आले आहे़ बांबवडे, तारळे या दोन उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्या असून, धुमाकवाडी, आवर्डे, कोंजवडे या उपसा सिंचन योजनांची कामे काही दिवसांत सुरू होणार आहेत़ पन्नास मीटर हेडने शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यात येणार आहे़ या धरणामुळे पाटण तालुक्यासह कऱ्हाड, सातारा, माण, खटाव तालुक्यांतील शेती सुजलाम्-सुफलाम् होणार आहे़ मात्र, तारळे विभागातील व इतर तालुक्यात देण्यात येणारे पाणी किती प्रमाणात देण्यात येणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे़ तारळी धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने यावर्षी अल्पावधीतच धरण भरून वाहू लागले़ धरणातील पाणीसाठ्याचा वापर शेती व अन्य कारणासाठी किती होणार, याची बहुतांश लोकांना माहितीच नाही़ अशातच काही दिवसांतच तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनांच्या पोटपाटाचे काम सुरू होणार आह़े यासाठी संबंधित विभागाच्या परूळेकर नामक अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी पाणी वापराबाबत चौकशी केली़ त्यावेळी त्यांनी दिलेली आकडेवारी व पाणीसाठा यामध्ये फारच तफावत दिसून आली़ संबंधित अधिकाऱ्यांना चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना ‘पुन्हा माहिती देतो,’ असे सांगितले़ त्यानंतर मात्र त्या अधिकाऱ्याने फोन घेणेच टाळले़ धरणाची पाणी साठवण क्षमता ५़८५ टीएमसी असताना अधिकाऱ्याने ९़०५, ८़८४, ७़४९, ६़३७ टीएमसी असा पाणी वाटपाचा हिशोब सांगितला आह़े़ वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ही गोष्ट गांभीर्र्याने घेतली नाही़