शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भुर्इंजमध्ये भरली येड्यांची जत्रा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2015 21:23 IST

शाळकरी मुलांना त्रास : दहाजणांचा समावेश; घबराटीचे वातावरण

राहुल तांबोळी -भुर्इंज  वाई तालुक्यातील भुर्इंज येथील शाळा, विद्यालयांसह विविध परिसरात सुमारे दहा वेडे फिरत आहेत. विशेषत: शाळा आणि विद्यालय परिसरात हे वेडे फिरत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. अचानकपणे एवढ्या मोठ्या संख्येने गावात वेडे आल्याने भुर्इंजमध्ये येड्यांची जत्रा भरल्याचे चित्र दिसत आहे. वास्तविक वेडे लोक हे मानसिक आजाराने त्रस्त असतात. अशा रुग्णांना उपचार देण्याची सुविधा राज्य शासनाने उपलब्ध केली आहे. त्यासाठी विविध संस्थांसह अनेकांना अनुदानही दिले जाते. असे असताना त्या संस्था किंवा संबंधित जबाबदार या वेड्यांना आपल्या संस्थेत का दाखल करून घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महामार्गावर फक्त एक आणि एकच भुयारी मार्ग सुस्थितीत आहे. तो म्हणजे भुर्इंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयासमोरील. भुर्इंज गावामध्येही एक आहे; मात्र तो बंद करण्यात आला आहे. कर्मवीर विद्यालयासमोरील भुयारी मार्ग सुसिस्थित ठेवण्याचे श्रेय स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष भैय्यासाहेब जाधवराव-इनामदार आणि प्राचार्य आर. एस. पाटील यांना जाते. मात्र याच भुयारी मार्गात वेड्याने ठाण मांंडल्याने विद्यार्थ्यांना तेथून येणे जाणे मुश्कील झाले आहे. मुळातच भुर्इंज येथील या विद्यालयात जाण्या येण्यात विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणी आहेत. त्यावर मात करून विद्यार्थी ज्ञानग्रहण करत आहेत. महामार्ग ओलांडणे ही समस्या असून, उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू नाही. चौपदरीकरणाच्या वेळीच उड्डाणपूल होणार होता; पण त्यात खोडा घातला. ग्रामपंचायतीने उपाययोजना करावी...वेडी व्यक्ती ही मानसिक रुग्ण असते. त्यांच्याकडून होणारे चाळे हे ते मुद्दाम करत नाहीत. हे खरे असले तरी सार्वजनिक ठिकाणी व विशेषत: करुन शालेय ठिकाणी त्यांचा असणारा वावर विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करणारा आहे. त्यामुळे या मानसिक रुग्णांना उपचार देण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी, हिंदुस्थानी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल भोसले, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर भोसले-पाटील, तसेच आनंद जाधवराव, बाल सम्राट मंडळाचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी केली आहे.