शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

वडगावमध्ये आले दोन्ही गोरे गट एकत्र!

By admin | Updated: August 27, 2015 21:47 IST

सरपंच निवड : भाजपाला डावलले; नव्या राजकारणाची नांदी

दहिवडी : माण तालुक्यातील वडगाव येथील सरपंच, उपसरपंच निवडीत आमदार जयकुमार गोरे व त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांचे गट एकत्र आले. यावेळी भाजपाला डावलण्यात आले. या एकत्रीकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.वडगाव हे माण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत समजले जाणारे गाव आहे. प्रत्येक निवडणूक ही अटीतटीची होत असते. भाजपप्रणित वडगाव विकास आघाडीचे ९ उमेदवार उभे केले. या गावात आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांचेही गट आहेत. त्यामुळे तिरंगी लढत होईल किंवा राज्य पातळीवरील विचार करता भाजप व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र येईल, असे वाटले होते. परंतु संपूर्ण तालुका दोन्ही गोरे बंधूंनी ढवळून काढला असताना याठिकाणी चक्क एकत्र निवडणुका लढविताना दिसले. आमदार गोरे समर्थकांनी ९ पैकी ५ तर शेखर गोरे समर्थकांनी ४ जागा लढविल्या. त्यामुळे याठिकाणी भाजप विरोधात काँग्रेस व रासप असे समीकरण झाले. त्यामध्ये भाजप ३ काँग्रेस ३ व रासप ३ अशा जागा निवडून आल्या. त्यामुळे आता काँग्रेसला बाजूला ठेवून भाजप-रासप युती होईल, असे वाटले; परंतु घडले उलटे. तालुक्यात एकमेकाच्या नावाने टीका करणारे दोन्ही भाऊ वडगाव ग्रामपंचायतीत मात्र एकत्र आले. तालुक्याला अपेक्षित नसतानाही भाजपवाल्यांना विरोधात बसावे लागले. जयकुमार गोरे मोठे बंधू असल्याने त्यांच्या पार्टीच्या नीलिमा अवघडे सरपंचपदी तर शेखर गोरे पॅनेलमध्ये नितीन ओंबासे उपसरपंचपदी निवडून आले. संपूर्ण तालुक्यात दोन्ही भावांचीच सत्ता, असे समीकरण तयार झाले.युतीचा राजकारणावर होणार परिणाम?भविष्यातही या युतीचे राजकीय परिणाम होऊ शकतात. बाजार समितीतही दोघांचे समान बलाबल असल्याने ही सत्ताही आपापसात वाटून घेतली जाणार का? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.आम्ही स्थानिक पातळीवर जय मल्हार परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढलो आहे. सरपंच हे आमदार गोरे व मी शेखर गोरे समर्थक आहे. आम्ही गावच्या विकासासाठी भाजप विरोधात एकत्र आलो आहे. - नितीन आेंबासे, उपसरपंच