शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकाच्या डबक्यात ‘बोटी’

By admin | Updated: May 11, 2015 00:46 IST

मनसेकडून खड्ड्यांचा अनोखा पंचनामा : आठ दिवसांची मुदत

कऱ्हाड : येथील एसटी बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे तसेच एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत कऱ्हाड आगारातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नसल्याचे सांगत रविवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी बसस्थानकात आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्थानकातील खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात कागदापासून तसेच कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेल्या बोटी सोडून आंदोलन केले. बसस्थानक आगार प्रमुखांनी स्थानकातील खड्ड्यांची आठ दिवसांत दुरुस्ती केली नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन क रण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, जिल्हा उपाध्यक्ष महेश जगताप, तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण, नितीन महाडिक, शहराध्यक्ष सागर बर्गे, चंद्रकांत पवार, स्वरूप निकम, प्रवीण गायकवाड, सागर जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. एक महिन्यापूर्वी एस. टी. बसस्थानकामध्ये पडलेले खड्डे मुजवण्यात यावेत, असे मनसे पदाधिकाऱ्यांनी आगार प्रमुखांना निवेदन दिले होते. त्याबाबत येथील आगार प्रमुख व महामंडळ प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, तसेच याबाबत दखल घेतली गेली नाही. त्यामुळे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे बसस्थानकातील खड्ड्यात तळे निर्माण झाले. स्थानकातील खड्ड्यांमुळे येथील प्रवाशांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानकात साठलेल्या खड्ड्यातील पाण्यात रविवारी खेळण्यातील कृत्रिम बोटी सोडल्या. तसेच कऱ्हाड बसस्थानक प्रमुख थोरात यांना धारेवार धरले असता अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर स्थानकातील पडलेले खड्डे मुजवण्यात येतील, असे आश्वासन दिल्याने मनसेने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. (प्रतिनिधी)